एसटी कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा! सोन्याच्या दागिन्यांची बॅग केली मालकाला परत
उमरगा प्रतिनिधी
कलियुगातही काही प्रामाणिक लोक असल्याची उदाहरणे समोर येत आहेत. एका प्रवाशाची एसटी बसमध्ये मौल्यवान दागिने असलेली बॅग विसरली होती. शनिवारी (दि १३) रोजी उमरगा ते पुणे प्रवासात दरम्यान विसरलेली बॅग अंदाजे पाच सोन्याच्या अंगठ्या आणि रोख रक्कम मिळून 50 हजार रुपये मुद्देमाल असलेली बॅग बसच्या वाहक बोंडगे ओमप्रकाश पंचप्पा परत केल्याची घटना घडली आहे.
उमरगा पुणे एसटी महामंडळाची उमरगा आगाराची बसेस रोज धावतात. शुक्रवारी उमरगा आगारातून निघालेली बस अनेक प्रवासी घेऊन प्रवास करत होती. एक प्रवासी सादिक आत्तार हे आपल्या सोलापूरला जात होते. यादरम्यान त्यांची बॅग एसटीमध्येच विसरले. त्यात सोन्याचे पाच अंगठे आणि रोख रक्कम एकूण मुद्देमाल 50000 चा बॅगमध्ये होता.मात्र, ही बॅग एसटी कंडक्टर (वाहक) बोंडगे ओमप्रकाश पंचप्पा लक्षात आल्यानंतर बॅग त्यांनी सांभाळून दुसऱ्या दिवशी पुण्याहून उमरगा ला परत आल्यावर प्रवाशाच्या स्वाधीन केली. यावेळी एसटी ड्रायव्हर माळी परमेश्वर, सुरक्षारक्षक आदी उपस्थित होते. त्यामुळे उमरगा आगारांतील वाहकबोंडगे ओमप्रकाश पंचप्पा यांच्या प्रमाणिकपणाचे आगारातील कर्मचाऱ्यांसह सर्व प्रवासी वर्गातून कौतुक करण्यात येत आहे.
एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास
आपल्या कर्तव्यात कोणताही कसूर न करता एसटी वाहक आणि चालकाने प्रामाणिकपणा दाखवून शनिवारी प्रवाशाची दागिनेची बॅग परत केली. त्यामुळे एसटीचा प्रवास आजही सुरक्षित असल्याचे यावरून दिसून आले आहे.