For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पोलीस कर्मचारी प्रदीप गोसावी यांचा प्रामाणिकपणा

04:40 PM Jun 03, 2026 IST | अनुजा कुडतरकर
पोलीस कर्मचारी प्रदीप गोसावी यांचा प्रामाणिकपणा
Advertisement

पैसे व कागदपत्रांचे सापडलेले पाकीट केले संबंधिताला परत

Advertisement

कुडाळ/ वार्ताहर

ओरोस हून वेंगुर्ले येथे वाहतूक नियमन ड्युटीस जात असताना जिल्हा वाहतूक शाखा ( सिंधुदुर्ग ) चे हवालदार प्रदीप शशिकांत गोसावी यांना कुडाळ पोलीस ठाणे समोरील रस्त्यावर पैशाचे पाकिट सापडले. त्यातील कागदपत्रामुळे ते पाकीट अनिकेत रोहीदास घाडी ( मूळ रा. श्रावण- मालवण,सध्या रा. कुडाळ - लक्ष्मीवाडी) या युवकाचे असल्याचे स्पष्ट झाले.श्री गोसावी यांनी कुडाळ येथेच ते पाकीट त्याला परत केले. पोलीस दलात सेवा बजावत असताना त्यांनी आपल्या माणुसकीतील प्रामाणिकपणा दाखविला आणि आपले कर्तव्य सिद्ध केले. प्रदीप गोसावी मुख्यालय जिल्हा वाहतूक शाखेत सध्या कार्यरत आहेत. मंगळवारी ओरोसहून वेंगुर्ले येथे ड्युटीवर जात होते.कुडाळ येथे पोलीस ठाण्या समोरील रस्त्यावर त्यांना एक पाकीट पडलेले दिसले. त्यांनी ते उचलले आणि आतील कागदपत्रांची पाहणी केली असता, ते अनिकेत रोहीदास घाडी याचे असल्याची खात्री झाली.त्यानंतर श्री गोसावी यांनी श्रावण पोलीस पाटील यांच्याशी संपर्क साधला.तेव्हा सदर युवक हा श्रावण येथील असल्याचे शिक्कामोर्तब झाले.तो कुडाळ येथेच मोलमजुरी करून आपला उदरनिवाह करतो, असे त्यांनी सांगितले.त्यानंतर त्या पोलीस पाटील यांच्याकरवी अनिकेत याने श्री गोसावी यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांच्या येथील निवासस्थानी आला. सदर पाकिट त्यांच्या ताब्यात दिले. सदर पाकिट रोख रक्कमसह आधार कार्ड, पॅनकार्ड होती. दुर्मिळ होत चाललेला प्रामाणिकपणा या पोलीस कर्मचाऱ्याच्या रुपाने पाहायला मिळाला. श्री गोसावी यांनी पोलीस दलाला साजेशी अशी ही कामगिरी करीत त्यांनी प्रामाणिकपणातही आपण कर्तव्यनिष्ठ असल्याचे दाखवून दिले.

Advertisement

Advertisement
Tags :

.