होंडाची नवी दमदार क्रूझर बाईक लाँच’; किंमत 2 लाख 22 हजार
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
होंडा या दिग्गज दुचाकी कंपनीने आपली नवी रिबेल 300 ही दमदार क्रूझर बाईक नुकतीच लाँच केली आहे. या बाईकची किंमत 2 लाख 22 हजार इतकी असणार असल्याची माहिती आहे. महत्त्वाचे म्हणजे ही बाईक विना क्लच दाबता गिअर बदलता येणारी आहे.
सदरची नवी गाडी स्टँडर्ड व ई क्लच या दोन प्रकारांमध्ये दाखल केली गेली आहे. रिबेल 300ही दुचाकी होंडा कंपनीने भारतातच तयार केली आहे. सदरच्या गाडीची विक्री होंडा बीग विंग या विक्रेत्यामार्फतच होणार आहे. ई क्लच या प्रकारातील गाडीची किंमत 2 लाख 62 हजार इतकी एक्स शोरुम ठेवण्यात आली आहे. तर स्टँडर्ड गाडीची किंमत 2 लाख 22 हजार इतकी आहे. या गाडीच्या सिटची उंची कमी ठेवण्यात आली असून दमदार डिझाईन हे गाडीचे आकर्षण आहे. गाडीची रचना सुंदरपणे करण्यात आली असून चालकाला वाहन चालविण्याचा आरामदायी आनंद लुटता येतो.
286 सीसीचे सिंगल सिलेंडर, लिक्वीड कूल्ड इंजिन या गाडीला देण्यात आले असून 30 एचपीची ऊर्जा हे इंजिन निर्माण करते. या गाडीमध्ये 6 स्पिड गिअर बॉक्स जोडला गेलेला आहे. यात टियरड्रॉप शेप फ्यूल टँक, राऊंड एलईडी हेडलॅम्प, 2 पिस सिट आणि शॉर्ट एक्झॉर्ट दिले गेलेले आहे. ही गाडी रॉयल इनफिल्डच्या गोवन क्लासिक 350 या बाईकशी स्पर्धा करेल.