होंडाची एसपी 160 लाँच
टीएफटी डिस्प्लेसह युएसबी-सी चार्जिंग, किंमतीत वाढ यासह नवे फिचर्स सोबत येणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
होंडा मोटरसायकल अॅण्ड स्कूटर्स इंडिया यांनी 2025 या नवीन वर्षासाठी कंपनीने त्यांची लोकप्रिय दुचाकी होंडा एसपी 160 ही सुधारीत आवृत्ती सादर केली आहे. या दुचाकीत प्रवासी मोटरसायकल विभागातील नवीन ट्रेंडमध्ये समावेश करण्यात आला आहे. मात्र अपडेटमुळे सदरच्या दुचाकीच्या किंमतीत थोडीशी वाढ करण्यात आली आहे.
सिंगल-डिस्क व्हेरिएंटची किंमत आता 3,000 रुपयांनी वाढून 1,21,951 रुपये झाली आहे, तर डबल-डिस्क व्हेरिएंटची किंमत 4,605 रुपयांनी वाढून 1,27,956 रुपये झाली आहे. होंडाने एसपी 160 च्या एकूण शैलीत आणि डिझाइनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. कंपनीने मात्र ही गाडी चार कलरमध्ये सादर केली आहे.
एसपी 160 मध्ये 4.2-इंचाचा टीएफटी डिस्प्ले आणि युएसबी -सी चार्जिंग पोर्ट राहणार आहे. अॅक्टिव्हा 125 आणि एसपी 125 च्या अलीकडील अपग्रेडनंतर एसपी 160 आता अधिक प्रगत 4.2 इंचाचा टीएफटी डिस्प्ले आणि युएसबी-सी चार्जिंग पोर्टसह लॉन्च केले गेले आहे. ही नवीन क्रीन बाइकला वेगळ्या वैशिष्ट्यांसह सादर करते. या व्यतिरिक्त यात ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी देखील आहे, ज्यामुळे हे वैशिष्ट्या ऑफर करणारी ही त्याच्या विभागातील एकमेव मॉडेल आहे.
कॉल अलर्ट आणि नोटिफिकेशन्स यांसारखी अतिरिक्त वैशिष्ट्यो मिळवण्यासाठी रायडर्स आता त्यांच्या स्मार्टफोनला बाइकशी कनेक्ट करू शकतात. यामुळे रायडरचा दैनंदिन प्रवास अधिक जोडलेला आणि सुलभ होतो.
या अद्यतनासह एसपी 160 देखील आगामी ओबीडी-2 बी मानक पूर्ण करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे, जे पुढील वर्षी लागू होणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
मोटरसायकल 162.71 सीसी सिंगल-सिलेंडर इंजिनयुक्त आहे जी 13.2 बीएचपी आणि 14.8 एनएम टॉर्क निर्माण करते. शहरी आणि उपनगरीय वाहन चालकांना अनोखा अनुभव प्राप्त करता येणार आहे.