होंडा-निस्सानचे विलीनीकरण जूनमध्ये
कंपन्यांचा परस्परांसोबत करार : एकत्रित येत कंपनीची निर्मिती करणार
वृत्तसंस्था/ टोकियो
वाहन क्षेत्रामधील दिग्गज कंपन्यांमध्ये होंडा आणि निस्सान या जपानी कार निर्मात्या कंपन्यांनी विलीनीकरणासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. कंपन्यांमधील चर्चेचा पहिला टप्पा सोमवारी (23 डिसेंबर) पार पडला. कंपन्यांनी अधिकृत निवेदनात ही माहिती दिली आहे. होंडा-निस्सानचे विलीनीकरण पुढील वर्षी जूनपर्यंत निश्चित केले जाऊ शकते. या कराराद्वारे, कंपन्या एक होल्डिंग कंपनी तयार करणार आहे. ज्यामध्ये दोघांचे समान समभाग असतील. नवीन होल्डिंग कंपनी ऑगस्ट 2026 पर्यंत टोकियो स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध केली जाणार आहे.
चीन-अमेरिका घसरणीचेमुख्य कारण
चीन आणि यूएस बाजारातील घटत्या विक्री आणि नफ्यामुळे कंपन्यांना त्यांचे कर्मचारी आणि उत्पादन क्षमता कमी करण्यास भाग पाडले आहे. काही काळापासून कंपन्यांच्या नफ्यातही सुमारे 70 टक्के घट होत आहे. बाजारपेठेतील घटता हिस्सा हे कंपन्यांना एकत्र येण्याचे कारण असू शकते.
विलीनीकरणानंतर जपानमध्ये दोन मोठ्या कंपन्या होणार आहेत.
या करारामुळे, जपानच्या वाहन उद्योगात दोन मोठ्या कंपन्या होणार
? होंडा, निस्सान आणि मित्सुबिशी यांच्या नियंत्रणाखालील होल्डिंग कंपनी आहे.
? टोयोटा ग्रुप कंपन्यांचा समावेश असलेला समूह.
निस्सानने फ्रान्सच्या रेनॉल्ट एसए सोबतचे संबंध कमी केले. होंडाने जनरल मोर्ट्समधून माघार घेतली. दोन्ही कंपन्यांनी इलेक्ट्रिक वाहनांसाठी बॅटरी सॉफ्टवेअरवर एकत्र काम करण्याचे मान्य केले होते.
होंडाचे समभाग 4 तर निस्सानचे 1.58 टक्क्यांनी मजबूत
23 डिसेंबर रोजी होंडा मोटरचे शेअर्स 3.82 टक्क्यांनी वाढले. होंडाचे बाजारमूल्य 6.74 लाख कोटी आहे. त्याचवेळी, निस्सानचे शेअर्स देखील 1.58 टक्क्यांनी मजबूत राहिले. कंपनीचे बाजारमूल्य 1.67 लाख कोटींच्या घरात पोहोचले आहे.