होंडाची पहिली ईव्ही दुचाकी ‘डब्लूएन 7’ सादर
600 सीसीचे इंजिन : 140 किमी धावणार
वृत्तसंस्था/ मुंबई
जपानी दुचाकी कंपनी होंडाने इटलीतील मिलान येथे सुरू असलेल्या इसीआयएमए-2025 मोटर शोमध्ये पूर्ण वैशिष्ट्यांसह त्यांची पहिली इलेक्ट्रिक मोटरसायकल डब्लूएन7 सादर केली आहे. कंपनीचा दावा आहे की ईव्ही 600 सीसी पेट्रोल बाईकइतकीच शक्तिशाली आहे आणि पूर्ण चार्जवर 140 किमी धावणार आहे. तसेच याला कारसारखे पुश स्टार्ट/स्टॉप बटण आहे.
यापूर्वी, कंपनीने इसीएमए मोटर शोमध्ये युरोपियन बाजारपेठेसाठी इलेक्ट्रिक बाईक सादर केली होती, जिथे तिची किंमत 130 किमीच्या रेंजसह 12,999 युरो (अंदाजे 15.56 लाख रुपये) होती. कंपनीने भारतात इलेक्ट्रिक बाईकच्या लाँचिंगबद्दल अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. ही बाईक भारतात 10-12 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत लाँच केली जाऊ शकते. ही ई-बाईक जपानमधील कुमामोटो कारखान्यात तयार केली जाईल.
नवीन बाईक इआयसीएमए 2024 मध्ये दाखवलेल्या कॉन्सेप्ट मॉडेलपासून प्रेरित आहे आणि डिझाइन देखील मिनिमलिस्टिक आणि नेकेड स्टाइल आहे. डिझाइन स्लिम आणि फ्युचरिस्टिक आहे.