होंडाची स्वस्त दुचाकी ‘शाईन 100’ लाँच
अपडेटेड ओबीडी-2 बी इंजिनसह अन्य वैशिष्ट्यो : किंमत 69000 रुपये राहणार
नवी दिल्ली : होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडिया भारतीय बाजारपेठेसाठी त्यांची स्वस्त दुचाकी श्रेणी अपडेट करत आहे. यामध्ये अॅक्टिव्हा 125, एसपी125, एसपी160, लिवो, युनिकॉर्न आणि शाईन 125 अपडेट केल्यानंतर कंपनीने आता शाईन100 ची नवीन अपडेट आवृत्ती बाजारात आणली आहे. कंपनीने ओबीडी2बी उत्सर्जन नियमांचे पालन करण्यासाठी 100 सीसी कम्युटर मोटरसायकलमधील इंजिनमध्ये बदल केले आहेत. ही दुचाकी आता नवीन ग्राफिक्स आणि एकत्रित ब्रेकिंग सिस्टमसह सादर केली आहे.
यामध्ये ई 20पेट्रोलवर देखील चालणार आहे. दुचाकी कंपनीच्या लोकप्रिय होंडा शाईन125 सीसीची छोटी आवृत्ती आहे. या गाडीची सुरुवातीची किंमत ही 68,767 रुपये इतकी एक्स शोरुम राहणार आहे. जी सध्याच्या मॉडेलपेक्षा 1867 रुपये अधिक राहणार आहे. ही दुचाकी देशातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या हिरो स्प्लेंडर, एचएफ डिलक्स आणि बजाज प्लॅटिना यांच्यासोबत स्पर्धा करणार आहे. नवीन शाईनचे बुकिंग सुरु झाले आहे. कंपनीने ही गाडी पाच रंगांमध्ये बाजारात आणली आहे.