‘एआय’वर होंडा, आयआयटी दिल्ली-बॉम्बेचे संयुक्त संशोधन
नवी दिल्ली :
जपानी वाहन निर्माता कंपनी होंडा यांनी बुधवारी आयआयटी दिल्ली आणि आयआयटी बॉम्बे यांच्या सोबत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानावर संयुक्त संशोधन सुरू करण्याची घोषणा केली. भारतासह जगाच्या विविध प्रदेशांमध्ये सुरू करता येणारे ड्रायव्हर सहाय्य आणि स्वयंचलित ‘ड्रायव्हिंग’ तंत्रज्ञान विकसित करण्याची कंपनीची योजना आहे.
संयुक्त संशोधनाचा उद्देश हेंडा सीआय (सहकारी बुद्धिमत्ता) अधिक वाढवणे हा आहे, असे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे. सीआय ही मुळात होंडा एआय आहे जी मशीन आणि लोक यांच्यातील परस्पर समंजसपणाला प्रोत्साहन देते. होंडा कार्स इंडिया लिमिटेड, भारतातील होंडाची उपकंपनी, दोन्ही आयआयटीसह संयुक्त संशोधन करारावर स्वाक्षरी करेल. निवेदनात म्हटले आहे की, ‘आयआयटीमध्ये मोठ्या संख्येने उत्कृष्ट संशोधक आणि अभियंते आहेत. होंडा त्या संस्थांसोबत संयुक्त संशोधनाद्वारे सीआयच्या अंतर्निहित तंत्रज्ञानाला प्रगत करण्याचा प्रयत्न करेल, तसेच त्या तंत्रज्ञानाच्या भविष्यातील अनुप्रयोगांवर लक्ष केंद्रित करेल ज्यामुळे वाहतूक अपघात कमी होतील आणि स्वयंचलित ‘ड्रायव्हिंग’ सक्षम होईल.