होंडा सिटी हायब्रिड कार येणार
पेट्रोलसह इलेक्ट्रिकवर चालणार : गाडीच्या बुकिंगला प्रारंभ
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
चारचाकी वाहन क्षेत्रातील दिग्गज कंपनी हेंडा आपली नवी सिटी हायब्रिड कार लाँच केली असून या गाडीकरीता बुकिंगला प्रारंभ झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे सदरची कार ही पेट्रोल व इलेक्ट्रिकवरही चालवता येणार आहे.
एक लिटर पेट्रोलवर ही कार 26 किलोमीटरचे मायलेज देणार आहे. याचप्रमाणे या गाडीचा टॉप स्पीड 176 किमी प्रति तास इतका असणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
पेट्रोलसह इलेक्ट्रिकवर चालणार
सदरची कार ही पेट्रोलवर तर चालवता येणार आहेच पण पूर्णता इलेक्ट्रिक पद्धतीवरही चालवता येणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. त्याचप्रमाणे हायब्रिड मोडवरही म्हणजेच पेट्रोल व इलेक्ट्रिकवरही नवी कार एकत्र चालवता येणार आहे. या कारमध्ये इलेक्ट्रिक इंजिनसह दोन इलेक्ट्रिक मोटर्सही दिल्या आहेत. कारमध्ये दोन सेल्फ चार्जिंगच्या दोन मोटारी, 1.5 लिटरचे एटकिन्शन सायकल पेट्रोल इंजिन तसेच ऍडव्हान्स लिथीयम आयन बॅटरीची जोड असणार आहे.
बुकिंग सुरू
सदरची गाडी प्रति लिटर इंधनावर सुमारे 26.5 किमीचे मायलेज देणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. देशातील सर्वाधिक मायलेज देणारी ही कार ठरणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. सदरची गाडी ही मे 2022 मध्ये अधिकृतरित्या लाँच केली जाणार आहे. आता सध्याला ग्राहकांना ही गाडी खरेदी करायची असल्यास 21 हजार रुपये आगाऊ भरावे लागणार आहेत.
कोणत्या कार्सना टक्कर
अधिकृत लाँचनंतर सदरची गाडी ही मारुतीपासून ते हय़ुंडाईच्या वेर्णा, स्कोडा स्लाव्हिया अशा कार्सना टक्कर देणार आहे.
काय असणार आहेत वैशिष्टय़े..
- चार चाकांवर डिस्क ब्रेक
- स्वविकसित एडीएएस यंत्रणा
- इमरजन्सी ब्रेकिंग, लेन किपींग असिस्ट
- ऍडेप्टीव्ह प्रुझ कंट्रोल
- प्रंट कोलीजन वॉर्निंग सिस्टम
- ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन