For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

घरातच बनविली अणुभट्टी

07:00 AM Feb 20, 2026 IST | Tarun Bharat Portal
घरातच बनविली अणुभट्टी
Advertisement

अमेरिकेच्या डल्लास शहरातील ही घटना आहे. या शहरातील एका 12 वर्षांच्या मुलाने घरातच न्यूक्लिअर फ्युजन (अणुकेंद्र संमिलन) साधन निर्माण केले आहे. ही एक अणुभट्टीच असून यात मर्यादित प्रमाणात अणुस्फोट घडवून विद्युत निर्मिती केली जाते. जगात अशा अनेक अणुभट्ट्या आहेत. त्या निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी लागते. तसेच, त्यांची सुरक्षा करण्यासाठीही मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करावा लागतो. कारण सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्यास अपघात होऊन अणुभट्टी फुटण्याची शक्यता असते. अणुभट्टी फुटल्यास मोठ्या प्रमाणात जीवीत आणि वित्त हानी होणे निश्चित असते. असे काही अपघात जगात झालेले आहेत. चेर्नोबिल येथे रशियाच्या अणुभट्टीला झालेल्या अपघातामुळे ती फुटली होती आणि तिच्यातून होणारा किरणोत्सर्ग अमेरिकेपर्यंत पोहचला होता. जपानमध्येही काही वर्षांपूर्वी भूकंप आणि त्सुनामीमुळे अणुभट्टी अपघात होऊन प्रचंड हानी झाली होती. असा उत्पात घडविणारी अणुभट्टी या बारा वर्षाच्या विद्यार्थ्याने आपल्या घरात बनविली असून या घटनेसंबंधी अनेकांनी मोठेच आश्चर्य व्यक्त केले आहे.

Advertisement

या विद्यार्थ्याचे नाव एडन मॅकमिलन असे असून तो सातवीच्या वर्गात शिकतो. वयाच्या आठव्या वर्षापासूनच त्याने हा प्रकल्प हाती घेतला होता. आजवर जगात एवढ्या लहान वयात जे कोणाला करता आलेले नाही, ते करुन दाखविण्याचा ध्यास त्याने घेतला होता. अणुविज्ञानाचा अभ्यास करता करता त्याला घरीच फ्युजन अणुभट्टी निर्माण करण्याची कल्पना सुचली आणि तो ती प्रत्यक्षात आणण्याच्या मागे लागला. त्याला त्याच्या मातापित्यांचाही पाठिंबा मिळाला. चार वर्षांच्या प्रयत्नांनंतर त्याचा प्रकल्प यशस्वी झाला आहे. अर्थातच, त्याने बनविलेली अणुभट्टी आकाराने अगदी छोटी आहे. तसेच या अणुभट्टीत अणुस्फोट केला जात नाही. तथापि, तिची रचना आणि उपयोगात आणली गेलेली साधने खऱ्या मोठ्या अणुभट्टीप्रमाणेच आहेत. आता या निर्मितीमुळे त्याचे नाव ‘गिनीज विश्वविक्रम पुस्तिके’त नोंद केले जाणार आहे.. तो जगातील वयाने सर्वात लहान असणारा अणुभट्टीनिर्माता ठरला आहे. त्याच्या कल्पनाशक्तीचे आणि धाडसाचे सोशल मिडियावरुन कौतुक केले जात असून प्रशासनानेही त्याला प्रोत्साहन दिले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.