महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

राहूल गुप्ता, विनायक पाटील यांना गृहमंत्री दक्षता पदक जाहीर

12:20 PM Nov 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पणजी : गोवा पोलिस खात्यात कार्यरत असलेले अधीक्षक राहूल गुप्ता आणि निरीक्षक विनायक पाटील यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर झाले आहे.  अधीक्षक राहुल गुप्ता गुन्हा अन्वेषण विभागात आणि सायबर गुन्हा विरोधी विभागात कार्यरत आहेत. निरीक्षक विनायक पाटील हे जीआरपीमध्ये आहेत. केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक दरवर्षी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ऑपरेशन, तपास, न्यायवैद्यकशास्त्र आणि बुद्धिमत्ता या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलिसांना हे पदक जाहीर केले जाते.

Advertisement

राहुल गुप्ता हे तिरप जिल्हा, अऊणाचल प्रदेश येथे काम करत असताना त्यांच्या प्रयत्नांमुळे व्हिटो एस आओमी हा कुख्यात खंडणीबहाद्दर सरकारी अधिकारी, व्यावसायिकांना लक्ष्य करून खंडणी गोळा करत होता. त्याला अटक करण्यात यश आले होते. या तपासकामात गुप्ता यांनी देखरेख करणे तसेच तपास अधिकाऱ्यांना योग्य मार्गदर्शन करण्याची उत्कृष्ट कामगिरी केली होती, त्याची दखल घेऊन गुप्ता यांना हे पदक जाहीर केले आहे.

Advertisement

निरीक्षक विनायक पाटील यांनी कुडचडे पोलिसस्थानकात निरीक्षक म्हणून कार्यरत असताना ऊपा पारकर खून प्रकरणाचा योग्यवेळी योग्यपद्धतीने तपास करून आरोपत्र दाखल केले होते.  ऊपा पारकर हिचा 2022 मे मध्ये खून झाला होता. त्यानंतर काही दिवसांनी तिचा मृतदेह अडगळीत कुजलेल्या अवस्थेत सापडला होता. निरीक्षक पाटील यांनी या प्रकरणाच्या तपासात उत्कृष्ट कामगिरी करून संशयिताला अटक केली होती. तसेच सर्व पुराव्यांसह आरोपपत्र दाखल केले असून हे प्रकरण सध्या न्यायालयात आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article