गृहमंत्री परमेश्वर बेटींग प्रकरणारत अडकले
06:43 AM Apr 22, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
त. भा. प्रतिनिधी/ बेंगळूर
Advertisement
गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर सट्टेबाजीच्या (बेटींग) प्रकरणात अडकले असून न्यायालयाने त्यांच्याविरोधात एफआयआर नोंदवून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. 42 व्या एसीजेएम न्यायालयाचे न्यायाधीश के. एम. शिवकुमार यांनी तुमकूरमधील कोडिगेहळ्ळी पोलिसांना एफआयआर नोंदवून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
2025 मध्ये तुमकूर येथे झालेल्या पीयू कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या कब•ाr सामन्यादरम्यान आपण जिल्हाधिकारी शुभा कल्याण यांच्यासोबत 500 ऊपयांची पैज लावली होती, असे परमेश्वर यांनी सांगितले होते. पैज लावणे हा गुन्हा आहे, अशी खासगी तक्रार एच. आर. नागभूषण यांनी दाखल केली होती. विजयी संघाला पुरस्कार देताना मंत्र्यांनी स्वत: हे कबूल केले होते. गंमत म्हणून पैज लावल्याचे मंत्र्यांचे विधान सार्वजनिक क्षेत्रात तीव्र चर्चेचा विषय बनले होते.
Advertisement
Advertisement