अनगोळ येथे घरगुती गणपती विसर्जन उत्साहात
बेळगाव : ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया मोरया, पुढच्या वषी लवकर’ च्या निनादात व फटाक्मयांच्या आतषबाजीत अनगोळ येथील घरगुती गणरायांना नाथ पै नगर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरासमोरील भक्त पुंडलिक विसर्जन तलाव येथे भक्तीभावाने आणि जड अंत:करणाने निरोप देण्यात आला. गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशी असा दहा दिवसांचा पाहुणचार घेतल्यानंतर अकराव्या दिवशी गणराय हे आपल्या गावी निघाले. गेले दहा दिवस भक्तांनी विविध रुपात आपल्या घरी गणरायाला विराजमान करून त्याची मनोभावे पूजाअर्चा केली. पुरणपोळी, लाडू, मोदक अशा विविध पंचपक्वान्नाचा नैवेद्याचा आस्वाद घेत दररोज सकाळ-सायंकाळी भक्तांकडून आपली सेवा करून घेऊन त्यांना अशिर्वाद देऊन अकराव्या दिवशी गणपती बाप्पा आपल्या घरी परतले.
शनिवारी गणेश भक्तांनी सकाळपासूनच नाथ पै नगर येथील विसर्जन तलावावर येण्यास सुऊवात केली होती. हळूहळू दुपारनंतर मोठ्या संख्येने गणेश भक्त गणरायाला निरोप देण्यासाठी येत होते. गणेश भक्त आपल्या लाडक्मया बाप्पाला डोक्यावरून, हातावर घेऊन, रिक्षा, कार, ट्रॅक्टर ट्रॉलीवर सजावट करून विसर्जनासाठी घेऊन आले. यावेळी फटाक्मयांची आतषबाजी ढोलताशाचा गजर, गुलालाची उधळण करीत लहान थोरांसह वयोवृद्ध नागरिकही यात सहभागी झाले होते. विसर्जन तलावासमोर येताच गणरायची आरती करून त्यांना निरोप देण्यात येत होता.
अनेक ठिकाणी गणरायाची सामूहिक मिरवणूक
अनगोळ येथील काही गल्ली विभागातून अनेकांनी सामुदायिक मिरवणूक काढून गणेश विसर्जन केले. एका ट्रॅक्टर ट्रॉलीवर मोठा पाठ घालून त्यावर गल्लीतील सर्वांचे गणपती एकत्र ठेवून फटाक्मयांची आतषबाजी करत ‘गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वषी लवकर या’ चा गजर करत मिरवणुकीने विसर्जन तलावाच्या ठिकाणी दाखल होताना दिसत होते. त्यामुळे जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी गणपतीची गाणी सुद्धा लावण्यात आली होती.