For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘तन्वी द ग्रेट’मध्ये दिसणारा हॉलिवूड अभिनेता

06:05 AM Aug 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘तन्वी द ग्रेट’मध्ये दिसणारा हॉलिवूड अभिनेता
Advertisement

अनुपम खे करणार दिग्दर्शन

Advertisement

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर दीर्घकाळानंतर दिग्दर्शनाच्या जगतात परतणार आहेत. 22 वर्षांनी ते दिग्दर्शक म्हणून ‘तन्वी द ग्रेट’ चित्रपट साकारणार आहेत. गेम ऑफ थ्रोन्स या सीरिजमध्ये जोरा मोरमोंट या भूमिकेसाठी ओळखले गेलेले इयान ग्लेन यांची या चित्रपटातील महत्त्वपूर्ण भूमिकेसाठी निवड करण्यात आली आहे.

अभिनेत्याने मुंबईत कलाकार आणि अन्य सदस्यांसोबत कामही सुरु केले आहे. अनुपम खेर आणि इयान ग्लेन यांनी यापूर्वीही एकत्र काम केले आहे. यापूर्वी अनुपम यांनी ब्रिटिश टीव्ही सीरिज मिसेस विल्सनमध्ये इयान यांच्यासोबत काम केले होते.

Advertisement

अनुपम खेर यांच्या या चित्रपटाला ऑस्करविजेते एम.एम. कीरवाणी यांचे संगीत लाभणार आहे. तर ऑस्कर विजेते रेसुल पुकुटी हे चित्रपटाचे साउंड डिझाइनर असतील. अनुपम यांनी ओम जय जगदीश या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पदार्पण केले होते. त्या चित्रपटात अनिल कपूर, फरदीन खान आणि अभिषेक बच्चन मुख्य भूमिकेत होता. चित्रपटात वहिदा रहमान यांनीही काम केले होते. परंतु तो चित्रपट फारसा यशस्वी ठरला नव्हता.

Advertisement
Tags :

.