For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मानवाधिकारावर राजकारण नव्हे, समग्र दृष्टीकोन आवश्यक

06:28 AM Feb 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
मानवाधिकारावर राजकारण नव्हे  समग्र दृष्टीकोन आवश्यक
Advertisement

संयुक्त राष्ट्रसंघात विदेशमंत्री जयशंकर यांचे आवाहन

Advertisement

वृत्तसंस्था/ संयुक्त राष्ट्रसंघ

मानवाधिकारांवरून ‘राजकीय वक्तव्यां’च्या पुढे जात विकास, क्षमतानिर्मिती आणि दहशतवादविरोधी कठोर भूमिका अवलंबिण्याच्या आवश्यकतेवर विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी जोर दिला आहे. मानवाधिकारांचा उद्देश दुर्बल वर्गाच्या लोकांच्या दैनंदिन जीवनात ठोस सुधार घडवून आणणे असावा असे जयशंकर यांनी म्हटले आहे.

Advertisement

संघर्ष, ध्रूवीकरण आणि अनिश्चिततेने ग्रस्त जगात भारत संयुक्त आधार शोधणे आणि त्याचा विस्तार करण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही सातत्याने संघर्षाऐवजी संवाद, विभाजनाच्या जागी सहमती आणि संकीर्ण हितांच्या जागी मानवकेंद्रीत विकासावर जोर दिला असल्याचे जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्रसंघ मानवाधिकार परिषदेच्या 61 व्या सत्रात स्वत:च्या व्हर्च्युअल संदेशात म्हटले आहे.

दहशतवादविरोधात शून्य सहिष्णूता

संयुक्त राष्ट्रसंघ आणि मानवाधिकार परिषदेला मानवाधिकारांबद्दल स्वत:च्या प्रतिबद्धतेला पूर्णपणे साकार करण्यासाठी ‘दहशतवादी कृत्यांसाठी शून्य सहिष्णुतेचा पुरस्कार’ करावा लागणार आहे. दहशतवाद हा मानवाधिकारांच्या सर्वात गंभीर उल्लंघनांपैकी एक आहे आणि याचे कुठलेच औचित्य असू शकत नाही, असे जयशंकर म्हणाले.

मानवाधिकार परिषदेचा सदस्य

भारत अलिकडेच 7 व्यांदा मानवाधिकार परिषदेचा सदस्य निवडला गेला आहे. भारताला याप्रकरणी संयुक्त महासभेत 188 पैकी 177 मते मिळाली आहेत. ही निवड जागतिक समुदाय, खासकरून ग्लोबल साउथच्या देशांच्या विश्वासाला दर्शविणारी आहे. भारत मानवाधिकारांना प्रोत्साहन देण्यासाठी राजकारण, दुहेरी मापदंड आणि सोयिस्कर भूमिकेऐवजी संवाद, भागीदारी आणि क्षमतानिर्मितीवर विश्वास करत असल्याचे जयशंकर यांनी सांगितले आहे.

मानवाधिकारांच्या रक्षणासाठी प्रतिबद्ध

जगातील सर्वात मोठी लोकशाही या नात्याने भारत सर्व लोकांसाठी समानता आणि सन्मानाच्या आधारावर मानवाधिकारांच्या रक्षणासाठी प्रतिबद्ध आहे. भारताच्या डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरमुळे कोट्यावधी लोकांना पारदर्शक पद्धतीने  कल्याणकारी योजना, वित्तीय सेवा आणि शासकीय सेवांचा लाभ मिळाला आहे. भारत स्वत:च्या अनुभवांना जागतिक हिताकरता मांडत आहे. महामारी, हवामान बदल, भू-राजकीय तणाव आणि आर्थिक दबावाने असमानतांना आणखी वाढविले असल्याने विकासाला मानवाधिकारांच्या मूळ आधाराच्या रुपात पाहणे आवश्यक ठरले असल्याचे जयशंकर यांनी म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.