महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

बेळगांव जिल्ह्यातील काही निवडक तालुक्यातील शाळांना उद्या सोमवारी सुटी

10:50 PM Jul 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

जोरदार पावसामुळे गेल्या आठ दिवसांपासून टप्प्याटप्प्याने रामदुर्ग वगळता जिल्ह्यातील अंगणवाडी, प्राथमिक, माध्यमिक व पदवीपूर्व महाविद्यालयांना जिल्हा प्रशासनाने सुटी जाहीर केली होती. आता पाऊस ओसरल्यामुळे केवळ गोकाक व मुडलगी तालुक्यातील शाळांना सोमवार व मंगळवार असे दोन दिवस सुटी जाहीर करण्यात आली आहे.

Advertisement

रविवारी रात्री जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी यासंबंधीचा आदेश जारी केला आहे. पाऊस व पुराचा फटका ज्या ज्या गावात बसतो आहे, केवळ त्याच गावातील शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. गोकाक, मुडलगी तालुक्यात सोमवार दि. 29 व मंगळवार दि. 30 जुलै रोजी दोन दिवस अंगणवाडी, सर्व सरकारी, अनुदानित व विनाअनुदानित प्राथमिक व प्रौढशाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे.

निपाणी तालुक्यातील सिदनाळ, हुन्नरगी, कुन्नूर, ममदापूर, के. एल. बारवाड, कारदगा, हुक्केरी तालुक्यातील संकेश्वर, होसूर, बडकुंद्री, कागवाड तालुक्यातील जुगूळ, शहापूर, मंगावती, कृष्णा कित्तूर, कात्राळ, बनजवाड, चिकोडी तालुक्यातील इंगळी, जनवाड, कल्लोळ, अंकली येथील शाळांना सोमवारी व मंगळवारी सुटी देण्यात आली आहे. दोन तालुके व वरील गावे वगळता इतर सर्व शाळा-कॉलेज सोमवारपासून सुरू होणार आहेत.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social mediaSchool holiday
Next Article