For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नैर्त्रुत्य रेल्वेकडून हॉलिडे स्पेशल एक्स्प्रेस सुरू

11:13 AM Apr 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
नैर्त्रुत्य रेल्वेकडून हॉलिडे स्पेशल एक्स्प्रेस सुरू
Advertisement

बेळगाव : उन्हाळी सुट्यांना सुरुवात झाल्याने रेल्वेला गर्दी होऊ लागली आहे. लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेसना होणारी गर्दी टाळण्यासाठी नैर्त्रुत्य रेल्वेने हॉलिडे स्पेशल फेऱ्या सुरू केल्या आहेत. म्हैसूर-अजमेर-म्हैसूर अशा सहा फेऱ्या तर भगत की कोठी-बेंगळूर अशा दोन फेऱ्या तर बेंगळूर-भगत की कोठी ही एक रेल्वेफेरी देण्यात आली आहे. म्हैसूर-अजमेर एक्स्प्रेस म्हैसूर येथून 13, 20, 27 एप्रिल तर 4, 11, 18 मे रोजी निघणार आहे. तर अजमेर-म्हैसूर एक्स्प्रेस 16, 23, 30 एप्रिल व 7, 14, 21 मे दरम्यान धावणार आहे. ही एक्स्प्रेस मंड्या, बेंगळूर, यशवंतपूर, तुमकूर, अरसीकेरे, चिक्कजाजूर, दावणगेरे, हरिहर, हावेरी, हुबळी, बेळगाव, मिरज, सांगली, पुणे, कल्याण, वसई रोड, सूरतमार्गे धावणार आहे. भगत की कोठी-बेंगळूर एक्स्प्रेस 21 व 27 एप्रिल दरम्यान धावणार आहे. तर बेंगळूर-भगत की कोठी एक्स्प्रेस 22 एप्रिल रोजी धावणार आहे. ही एक्स्प्रेस लुनी, समद्री, मोकान्सर, जेलूर, वडोदरा, वसई रोड, पुणे, मिरज, बेळगाव, हुबळीमार्गे बेंगळूरला पोहोचणार आहे. सुटीच्या काळात होणारी गर्दी लक्षात घेऊन नैर्त्रुत्य रेल्वेने विशेष रेल्वेफेरी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.