महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

बेळगाव ग्रामीण, खानापूर,कित्तूर तालुक्यातील अंगणवाड्यांना सुटी

11:38 AM Aug 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : संततधार पावसामुळे बेळगाव ग्रामीण, खानापूर व कित्तूर तालुक्यातील अंगणवाड्यांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सोमवारी यासंबंधीचा आदेश जारी केला आहे. बेळगाव ग्रामीण मतदारसंघ, खानापूर व कित्तूर तालुक्यात संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे लहान मुलांचे हित लक्षात घेऊन बेळगाव ग्रामीण मतदारसंघ व खानापूर तालुक्यात मंगळवार दि. 6 ऑगस्ट ते शनिवार दि. 10 ऑगस्टपर्यंत, कित्तूर तालुक्यात 6 ते 8 ऑगस्टपर्यंत अंगणवाड्यांना सुटी जाहीर करण्यात आली आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article