For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कोरे गल्लीत होळी पारंपरिक पद्धतीने साजरी

10:33 AM Mar 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
कोरे गल्लीत होळी पारंपरिक पद्धतीने साजरी
Advertisement

बेळगाव : कोरे गल्ली, शहापूर येथे 90 वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने होळीचे आयोजन केले जाते. बेळगाव परिसरात होळीच्या रात्री होळीचे दहन केले जाते. परंतु, कोरे गल्ली येथे सांगली संस्थानच्या प्रथेनुसार धूलिवंदनाच्या दिवशी होळीचे दहन केले जाते. सोमवारी दुपारी होळीचे दहन करण्यात आले. त्यानंतर गल्लीतील भजनी मंडळाने भजनाचा कार्यक्रम सादर केला. पाच दिवसांनी परंपरेनुसार रंगपंचमी साजरी केली जाणार आहे. यावेळी गल्लीतील पंच गजानन सावंत, शांताराम गावडोजी, शिवाजी मजुकर, मनोहर शहापूरकर, बंडू मजुकर, सुधीर नेसरीकर, गजानन शहापूरकर यासह युवक व महिला मंडळाच्या पदाधिकारी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.