For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चव्हाट गल्लीत होळी उत्सव यावर्षीही उत्साहात साजरा करणार

11:19 AM Mar 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
चव्हाट गल्लीत होळी उत्सव यावर्षीही उत्साहात साजरा करणार
Advertisement

बेळगाव : चव्हाट गल्ली येथे प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही मोठ्या उत्साहात होळी उत्सव साजरा केला जाणार आहे. रविवारी रात्री गाड्याला रंगून होळीसाठी लागणारे साहित्य काढण्यात आले. सोमवार दि. 2 रोजी होळी आणण्यासाठी चव्हाट गल्लीतील भक्त व बैलगाड्याधारक दुपारी 3 वाजता किल्ला येथे पोहोचणार आहे. चंद्रग्रहणामुळे यावर्षी कार्यक्रमात काहीसा बदल केला आहे.

Advertisement

सर्वांच्या बैठकीमध्ये यंदाच्या होळीबाबत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सोमवारी रात्री 12 वाजता चव्हाटा मंदिराकडे होळी उभी केली जाणार आहे. ग्रहणाच्या आधी अग्नी देण्यासाठी मंगळवार दि. 3 रोजी सकाळी 9 ते 10 या वेळेत अग्नी पेटविला जाणार आहे. त्यानंतर भाविकांनी लोटांगण घालायचे आहे. चंद्रग्रहणाचे वेध सकाळी 11.30 वाजता सुरू होणार आहेत. त्यामुळे मंगळवारी सायंकाळी 7 वा. गाऱ्हाणे घातले जाईल व त्यानंतर नवसाचा नारळ अर्पण केले जाणार आहेत.

अंधारात दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांना आपण फेकलेला नारळ दिसणार नाही. त्यामुळे कोणत्याही भक्ताला इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. श्री चव्हाटा हे चव्हाट गल्लीतील एक जागृत देवस्थान असल्याने सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन चव्हाट गल्ली पंचमंडळ, चव्हाटा युवक मंडळ व चव्हाट गल्लीतील नागरिकांनी केले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.