वडगाव मंगाई मंदिरात पारंपरिक पद्धतीने होलिकोत्सव
12:04 PM Mar 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : वडगाव येथील मंगाईदेवी देवस्थानात पारंपरिक पद्धतीने होळी साजरी केली जाणार आहे. या निमित्ताने शनिवारी मंगाईदेवी पंच मंडळाची बैठक पार पडली. ग्रहणामुळे अनेक तर्कवितर्क व्यक्त केले जात असले तरी वडगावमध्ये पारंपरिक पद्धतीनेच होळी साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला. पाचव्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाणार आहे. नागरिकांनीही दरवर्षीप्रमाणेच पारंपरिक पद्धतीने हालिकोत्सव साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी पंच मंडळ तसेच चव्हाण-पाटील बंधू सहभागी झाले होते.
Advertisement
Advertisement