गोव्यात आज होळी उत्सव
12:41 PM Mar 13, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
पणजी : राज्यात आज पारंपरिक होळी उत्सव होत असून गावागावात आणि शहरांमध्ये देखील पारंपरिक होलिका दहन करून शिगमोत्सव थाटात साजरा होणार आहे. राज्यातील जनता होळी उत्सवाच्या स्वागतास सज्ज झाली आहे.आजच्या होळी उत्सवाने गोव्यातील शिगमोत्सवाला प्रारंभ होईल. गोव्यातील परंपरेनुसार विविध गावात आज रात्री उशिरा होळीनिमित्त आंब्याचे झाड, भिरंडीचे झाड किंवा पोफळीची माडी आणून तिची मिरवणूक काढून नंतर मंदिराच्या समोर व गावच्या सीमेवर तिचे दहन केले जाते. काही ठिकाणी मंदिरासमोर एका खड्ड्यात पुरली जाते. काही ठिकाणी उद्या म्हणजे शुक्रवारी होळी उत्सव साजरा होईल. शुक्रवारी सर्वत्र धुलीवंदन तथा गुलाल उत्सव साजरा केला जाईल.
Advertisement
Advertisement