एफआरपी संदर्भात बैठक घ्या, अन्यथा आंदोलन
कोल्हापूर :
एफआरपी संदर्भात साखर कारखानदारसमवेत आठ दिवसात बैठक आयोजित करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा अनिल उर्फ सावकार मादनाईक यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांना निवेदन दिले.
दरवर्षीं शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी, साखर कारखान्यांचे विश्वस्त जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख व साखर सहसंचालक यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात ऊस दर संदर्भात वैठक होऊन पहिल्या उचलीचा निर्णय जाहीर होत होता.यावर्षी झालेल्या विधानसभेच्या निवडणुका आणि हेतु पुरस्सर कारखानदारांनी लांबवलेला गळीत हंगाम यामुळे पहिली उचल याबाबत निर्णय झालेला नाही. अशा परिस्थीतीत ऊस तोड बंद आंदोलन करणे शेतकरी व कारखानदार यांच्या हिताचे नाही याची जाणीव आहे.यामुळे ऊस तोड व रस्त्यावरील आंदोलन केलेले नाही. यावर्षी 10.25 या रिकव्हरीला 3400 रुपये दर मिळणार आहे. कोल्हापुर जिह्यातिल रिकव्हरीचा व उपपदार्थातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा विचार करता 3700 रूपये प्रतिटन पहिली उचल शेतकऱ्याना मिळणे सहज शक्य आहे. गत वर्षाचा एफआरपी बेस गृहित धरून कांही साखर कारखान्यांनी देवू केलेली रक्कम ऊस उत्पादकांना मान्य नाही. त्यामुळे कधीही व कोणत्यही वेळेला गळीत हंगाम रोखू शकतो हा आजवरचा इतिहास आहे. संघर्ष होवू नये ही नैतीक जबाबदारी स्विकारून प्रशासनाने त्वरीत साखर कारखानदारांच्या बरोबर बैठक घडवून आणावी व पहिली उचलेचा निर्णय जाहीर करावे, आम्हाला गळीत हंगाम रोखावा लागेल असे निवेदनात म्हटले आहे. जिह्याचे पालक या नात्याने आपण येनाऱ्या आठ दिवसात बैठक घडवून आणावी अन्यथा आंदोलन अटळ आहे असा इशाराही दिला आहे.
यावेळी अनिल उर्फ सावकार मादनाईक,जालिंदर पाटील, मिलिंद साखरपे, जर्नादन पाटील, वैभव कांबळे, शैलेश आडके, सागर मादनाईक, सतीश हेगण्णा, अनिल पाटील, अमोल मगदूम, भाऊसो हेरवाडे, शिवगोंडा पाटील, रोहन पाटील, दानलिंग दणाणे, निखिल इंगळे, पायगोंडा पाटील, संजय चौगुले उपस्थित होते.