हॉक्ले यांची राजीनाम्याची घोषणा
वृत्तसंस्था/ सिडनी
क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे प्रमुख कार्यकारी (सीईओ) निक हॉक्ले यांनी रविवारी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली आहे. पुढील वर्षीच्या मार्चमध्ये हॉक्ले आपल्या पदाचा त्याग करणार आहेत. गेली पाच वर्षे हॉक्ले यांनी क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सीईओपद समर्थपणे हाताळले होते. सदर बातमी सिडनी मॉर्निंग हेराल्ड या वृत्तपत्राने प्रसिद्ध केली आहे.
निक हॉक्ले यांनी क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सीईओपद पाच वर्षे सांभाळले. दरम्यान हे पद दीर्घकाळासाठी रहात नसल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे प्रमुख माईक बेअर्ड आणि त्यांच्या संचालकांनी म्हटले आहे. हॉक्ले यांनी आपल्या पदाच्या राजीनाम्याची घोषणा करुन अनपेक्षीत धक्का दिला आहे. दरम्यान क्रिकेट ऑस्ट्रेलिया आता नव्या सीईओची निवड लवकरच करणार आहे. भारतीय क्रिकेट संघ नोव्हेंबरच्या उत्तरार्धात ऑस्ट्रेलियात दाखल होणार आहे. तत्पूर्वी क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या नव्या सीईओची नियुक्ती केली जाईल, असे सांगण्यात आले. सीईओ पदासाठी जेम्स ऑलसॉप, स्टिफेनी बेलट्रेमी, ऑस्ट्रेलियन महिला संघाची माजी कर्णधार बेलिंडा क्लार्क आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू संघटनेचे सीईओ टॉड ग्रीनबर्ग इच्छुक आहेत.