विश्वचषक हॉकी स्पर्धा बोधचिन्हाचे अनावरण
वृत्तसंस्था / चेन्नई
28 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर दरम्यान चेन्नई आणि मदुराई यांच्या संयुक्त यजमानपदाने होणाऱ्या आंतरराष्ट्रीय हॉकी फेंडरेनशच्या पुरूषांच्या कनिष्ठ विश्व़चषक हॉकी स्पर्धेच्या बोधचिन्हाचे अनावरण येथील राधाकृष्णन स्टेडियमवर मोठ्या थाटात करण्यात आले. त्याचप्रमाणे या स्पर्धेचे यजमानपद भूषविणाऱ्या तामिळनाडू राज्याने चषकाच्या दौऱ्याचेही उद्घाटन झाले.
तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन तसेच आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनचे अध्यक्ष दातो तयाब इक्रम यांच्या हस्ते या स्पर्धेतील चषकाच्या दौऱ्याला ध्वज दाखविण्यात आला. स्पर्धेतील विजेत्याला देण्यात येणाऱ्या चषकाचा दौरा तामिळनाडूतील 38 जिल्ह्dयातून जाणार आहे. चषकाच्या दौऱ्याचा मार्ग कन्याकुमारी आणि चेन्नई असा राहील. या समारंभाला हॉकी इंडियाचे सरचिटणीस भोलानाथ सिंग तसेच भारतीय हॉकी क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.