For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चिटणीसला हॉकी, हँडबॉलचे जेतेपद

10:43 AM Sep 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
चिटणीसला हॉकी  हँडबॉलचे जेतेपद
Advertisement

बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खात्याच्या वतीने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय हॉकी स्पर्धेमध्ये  मुलींच्या गटामध्ये जी जी चिटणीस शाळेने कॅन्टोन्मेंट संघाचा 1-0 असा पराभव केला तर माध्यमिक मुलींच्या गटामध्ये जी जी चिटणीस शाळेने कॅन्टोन्मेंट संघाचा 1-0 असा पराभव  करन विजेतेपद मिळविले. हे संघ जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहे.

Advertisement

प्राथमिक हॉकी मुलींचा संघ संचिता पाटील, पद्मश्री सुतार, तनुश्री भवानी, स्नेहा पादी, श्रेया बनकर ,किर्ती गुऊस्वामी, वैभवी राजमाने, सेजल नंद्याळकर. अमृता नंदगडकर ,सेजल पाटील, मनहा मुजावर, सायली पाटील, माहीम मुल्ला, प्रणवी हनुमानवर, माध्यमिक मुलींचा संघ सेजल भावी, वैष्णवी  इतनाळ, श्रेया गोलीहली, राघवी गुंडपण्णर, निशा दोडमणी, तनिष्का कापडेकर, तनवी रेवाडी, साईश्री नेकनार, श्रेया चिगरे, समीक्षा चव्हाण, तनुश्री गावडे, वैष्णवी नाईक, अतिथी शेट्टी, भूमी लटकन, झारा शेख, अस्मि कामत, तनिष्का असलकर, आऊषी बसूर्तेकर, महेक बिस्ती आदी खेळडुंचा समावेश आहे. जिल्हास्तरीय हॉकी स्पर्धा 27 सप्टेंबर 2024 रोजी  रामदुर्ग येथील चंदरगी स्पोर्ट्स स्कूल चंदरगी येथे होणार आहेत.

तालुकास्तरीय हँडबॉल स्पर्धेमध्ये मुलांच्या अंतिम सामन्यांमध्ये प्राथमिक मुलांच्या जी जी चिटणीस संघाने कॅन्टोन्मेंट संघाचा 4-3 असा पराभव करीत विजेतेपद पटकावले आहे. हा संघ जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. मुलांचा संघ खालील प्रमाणे कृष्णा गोंडाडकर. साईश कदम, आकाश पाठक, श्रेयस  शेट्टी, वरद पोतदार, तीर्थ पाटील, मोहम्मद अत्तार, साई बसरीकट्टी, वेदांत शिंदे, साई मोटे, साकेत येरमाळकर, अनुस जैन आदींचा समावेश आहे. जिल्हास्तरीय हँडबॉल स्पर्धा 8 ऑक्टोंबर 2024 रोजी संत मीरा शाळेच्या मैदानावरती होणार आहे. वरील सर्व क्रीडापटूंना क्रीडा शिक्षक जयसिंग धनाजी यांचे मार्गदर्शन तर शाळेच्या  मुख्याध्यापिका डॉ. नवीन शेट्टीगार व शाळेचे अध्यक्ष चंद्रहास अणवेकर शिक्षक वर्ग यांचे प्रोत्साहन लाभत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.