For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हॉकी प्रशिक्षक मायकेल नॉब्स यांचे निधन

06:00 AM Jan 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
हॉकी प्रशिक्षक मायकेल नॉब्स यांचे निधन
Advertisement

वृत्तसंस्था/मेलबर्न

Advertisement

ऑस्ट्रेलियाचे माजी आंतरराष्ट्रीय हॉकीपटू तसेच 2012 च्या लंडन ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतीय पुरुष हॉकी संघाचे तत्कालीन प्रमुख प्रशिक्षक मायकेल नॉब्स यांचे वयाच्या 72 व्या वर्षी दीर्घकालीन आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी ली कॅप्स आणि कन्या कॅटलिन असा परिवार आहे. गेल्या काही दिवसांपासून नॉब्स यांची प्रकृती खूपच खालावली होती. आंतरराष्ट्रीय हॉकी क्षेत्रामध्ये 1979 ते 1985 या कालावधीत नॉब्स यांनी ऑस्ट्रेलियन हॉकी संघाचे प्रतिनिधीत्व करताना 76 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. मायकेल नॉब्स यांच्या निधनाबद्दल ऑस्ट्रेलियन हॉकी संघटना तसेच हॉकी इंडियाच्या पदाधिकाऱ्यांनी श्रद्धांजली वाहिली.

Advertisement
Advertisement
Tags :

.