Sangli News | भिलवडी मार्गावर हिट अँड रन; पाठीमागून धडक देऊन ४० वर्षीय तरुणाचा मृत्यू
भिलवडी : नागठाणे फाटाते भिलवडी जाणाऱ्या मार्गावर वेगाने आलेल्या मोटरसायकलस्वाराने अज्ञात मागून जोराची धडक दिल्याने अंकलखोप येथील ४० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि. ३१) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. बट्या उर्फ विनोद सदाशिव लांडगे (रा. अंकलखोप) असे मृत तरुणाचे नाव आहे.
याबाबत मृत विनोद लांडगे यांचे मित्र बाबासाहेब धोंडीरामकांबळे (रा.अंकलखोप) यांनी भिलवडी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात मोटरसायकलस्वारा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागठाणे फाटा ते भिलवडी या डांबरी रस्त्यावर दत्ता कुराडे यांच्या घरासमोर विनोद लांडगे हे येत असताना अज्ञात मोटरसायकल स्वाराने रस्त्याची परिस्थिती मोटरसायकल भरधाव निष्काळजीपणे चालविली. व व सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करूनत्याने विनोद लांडगे यांना पाठीमागून जोराची धडक दिली.
या अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी हलविण्यात आले; मात्र त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.दरम्यान अपघातानंतर संबंधित मोटरसायकलस्वार घटनास्थळावरून निघून गेल्याने त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. अज्ञात मोटरसायकल पोलिसांच्या तपासाचा केंद्रबिंदू असून, अपघातास कारणीभूत ठरलेल्या वाहनचालकाचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. या प्रकरणी भिलवडी पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास भिलवडी पोलीस करीत आहेत.