For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कर्तव्य पथावर रचला जाणार इतिहास

06:28 AM Jan 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
कर्तव्य पथावर रचला जाणार इतिहास
Advertisement

कॅप्टन संध्या यांच्या नेतृत्वात तिन्ही दलांची महिला तुकडी करणार संचलन

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

प्रजासत्ताक दिनासाठी पहिल्यांदाच सैन्य, नौदल आणि वायुदलाच्या त्रि-सेवा महिलांची एक तुकडी कर्तव्य पथावर संचलन करणार आहे. या तुकडीचे नेतृत्व 26 वर्षीय कॅप्टन संध्या करणार आहेत. याचे नेतृत्व करण्याची संधी मिळाल्याने मी स्वत:ला भाग्यवान समजत आहे. हा माझ्यासोबत टीमच्या प्रत्येक सदस्यासाठी गर्वाचा क्षण असल्याचे उद्गार कॅप्टन संध्या यांनी काढले आहेत. या तुकडीत प्रामुख्याने अग्निवीरांचा समावेश आहे.

Advertisement

या ऐतिहासिक क्षणाच्या तयारीसाठी 148 सदस्यीय टीम डिसेंबरच्या प्रारंभापासून दिल्लीत आहे. या टीमने यापूर्वी दोन महिन्यांपर्यंत स्वत:च्या तळांवर सराव केला होता. तिन्ही दलांचा सराव आणि प्रक्रियांमध्ये फरक असूनही तुकडीने एक समान लक्ष्यासोबत एकजूट युनिटच्या स्वरुपात एकत्रित प्रशिक्षण घेतले आहे.

आम्ही आमच्या प्रत्येक पावलावर स्वत:ची सर्वश्रेष्ठ, उदयोन्मुख नारीशक्तीचे प्रदर्शन करावे हेच लक्ष्य असल्याचे कॅप्टन संध्या यांनी म्हटले आहे. दिल्ली निदेशालयातून एनसीसी कॅडेटच्या संध्या यांनी यापूर्वी 2017 मध्ये प्रजासत्ताक दिन संचलनात भाग घेतला होता.

नौदल आणि वायुदलातून येणाऱ्या महिला सैनिकांना प्रारंभी हे काहीसे आव्हानात्मक वाटले, कारण तिन्ही दलांमधील सराव आणि प्रक्रिया वेगवेगळ्या आहेत. आम्ही सर्वांनी उत्तम सराव केला असून 23 जानेवारी राजी फुल ड्रेस रिहर्सलसाठी आम्ही तयार आहोत. देशाच्या प्रगतीत महिलांची महत्त्वाची भूमिका असून त्यांच्यात अमर्यादित क्षमता आहेत. महिला उमेदवार निमलष्करी दलात नेतृत्व करत होत्या, परंतु आता सरकारने संरक्षण सेवांमध्ये महिला सैनिकांना सामील करण्यास सुरुवात केल्याने मला या ऐतिहासिक दिनाचा हिस्सा होण्याची संधी मिळाल्याचे कॅप्टन संध्या यांनी म्हटले आहे.

महिला सैनिक तिन्ही संरक्षण दलांमधून एकत्र येत प्रजासत्ताक दिन संचलनात सामील होण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. 26 जानेवारी रोजी कर्तव्य पथावर 75 व्या प्रजासत्ता कदिन सोहळा मोठ्या प्रमाणात ‘महिला-केंद्रीत’ असणार आहे, ज्याचा मध्यवर्ती विषय भारताची लोकशाही आणि एक विकसित देश होण्याचा संकल्प आहे.

Advertisement
Tags :

.