'साहेब... मी दर्शनाला आलोय ओ'; एआय कॅमेराच्या जाळ्यात सापडला रेकॉर्डवरील गुन्हेगार
कोल्हापूर: शारदीय नवरात्र उत्सवात अंबाबाई मंदिरात भाविकांची गर्दी असताना, पोलिसांच्या अत्याधुनिक एआय कॅमेरा यंत्रणेने एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराला ट्रॅप केले. मात्र चौकशीअंती तो गुन्हा करण्यासाठी नव्हे, तर कुटुंबीयांसह देवीच्या दर्शनासाठी आल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी तासभराच्या चौकशीनंतर त्याला सोडून दिले.
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने सुरक्षेसाठी मंदिर आणि परिसरात एआय फेस रेकग्निशन तंत्रज्ञान असलेले कॅमेरे बसवले आहेत. या सॉफ्टवेअरमध्ये सुमारे शारदीय नवरात्र उत्सवात अंबाबाई मंदिरात भाविकांची गर्दी असताना, पोलिसांच्या अत्याधुनिक एआय कॅमेरा यंत्रणेने एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराला ट्रॅप केले. मात्र चौकशीअंती तो गुन्हा करण्यासाठी नव्हे, तर कुटुंबीयांसह देवीच्या दर्शनासाठी आल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी तासभराच्या चौकशीनंतर त्याला सोडून दिले.
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने सुरक्षेसाठी मंदिर आणि परिसरात एआय फेस रेकग्निशन तंत्रज्ञान असलेले कॅमेरे बसवले आहेत. या सॉफ्टवेअरमध्ये ५००० रेकॉर्डवरील गुन्हेगारांची छायाचित्रे अपलोड केली आहेत. मंदिर परिसरात एखादा संशयित गुन्हेगार फिरताना दिसल्यास हा कॅमेरा तत्काळ त्याला ओळखून प्रशासनाला अलर्ट पाठवतो. त्याच पद्धतीने अंबाबाई मंदिरात कुटुंबीयांसह दर्शनासाठी आलेल्या एका संशयिताचा चेहरा एआय कॅमेऱ्यामध्ये टॅप झाला. कॅमेऱ्याने तत्काळ पोलीस नियंत्रण कक्षाला सूचना दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला मंदिर परिसरातून ताब्यात घेऊन सुमारे तासभर कसून चौकशी केली.
चौकशीत तो पुणे हडपसर येथील रहिवासी असून आपल्या कुटुंबीयांसह केवळ अंबाबाईच्या दर्शनासाठी आल्याचे निष्पन्न झाले. त्याच्या कुटुंबीयांचीही चौकशी करून खात्री पटल्यानंतर पोलिसांनी त्याला सोडून दिले. या घटनेमुळे मंदिर परिसरातील एआय सुरक्षा यंत्रणा किती सतर्क आणि सक्षम आहे, हेच दिसून आले आहे. गर्दीच्या काळात अनुचित प्रकार टाळण्यासाठी ही यंत्रणा अत्यंत उपयुक्त ठरत आहे.
