कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Konkan News : मुबलक पाणी असूनही महिला 'या' इतिहासकालिन विहीरीतूनच पाणी का आणतात?

03:29 PM May 19, 2025 IST | Snehal Patil
Advertisement

या विहिरीतील पाण्यासाठी महिलांची ही पायपीटही कौतुकास्पद ठरत आहे.

Advertisement

By : प्रशांत चव्हाण

Advertisement

गुहागर : पूर्वी ग्रामीण भागात पाणी योजना नव्हत्या. त्यावेळी महिलांना पाणी आणण्यासाठी डोक्यावऊन हंडा, कळशी घेऊन दूरवऊन पायपीट करावी लागायची. मात्र, बदलत्या काळात शासनाच्या पाणी योजना आल्या आणि घरोघरी नळजोडणी मिळाली. मात्र, तालुक्यात म्हसकरवाडी हे असे एक गाव आहे की, तेथे मुबलक पाण्याचे इतर स्त्रोत असूनही तेथील महिलांनी इतिहासकालीन विहिरीचे पाणी आणण्यास प्राधान्य दिलेले आहे.

या विहिरीतील पाण्यासाठी महिलांची ही पायपीटही कौतुकास्पद ठरत आहे. तालुक्यातील त्रिशूळसाखरी म्हसकरवाडी येथे इतिहासकालीन विहीर आहे. संपूर्ण काळ्या कातळाची ही विहीर असून कोणतेही बांधकाम नाही. कातळाच्या सहाय्याने विहिरीतून ये-जा करण्यासाठी पायऱ्यांची केलेली रचना ऐतिहासिक कलेची साक्ष देणारी आहे. जवळपास 40 फूट खोप असणारी ही विहीर येथील नागरिकांची बारमाही तहान भागविणारी ठरत आहे.

अलिकडे काँक्रीटची केलेली बांधकामे तात्काळ ढासळतात. मात्र, काळ्या कातळात खोदण्यात आलेल्या या विहिराला जरासुद्धा धक्का लागलेला नाही. या विहिरीचे पाणी इतके चविष्ट की, म्हसकरवाडीत सार्वजनिक पाणवठ्यांचे कितीही पाणी मुबलक असले तरी या पाण्याची गोडी तसभूरही कमी झालेली नाही, हे विशेष.

या पाण्यातील गोडव्यानेच या गावातील म्हसकरवाडी येथील महिला या विहिरीचे पाणी भरताना दिसतात. शासनाच्या पाणी योजना घरापर्यंत गेलेल्या असल्या तरी यांना बाजूला सारुन या ऐतिहासिक विहिरीचे पाणी पायऱ्यांनी चढ-उतार करुन भरणे तितके आजकालच्या जमान्यात कुणालाही शक्य नाही. मात्र, येथील महिलांनी या विहिरीच्या पाण्याचा गोडवा वाढवून परंपरचे दर्शन घडवून आणले आहे.

तहान भागविणारी विहीर

"त्रिशूळसाखरी म्हसकरवाडीत सार्वजनिक बोअरवेल आहेत. मात्र, त्यांचे पाणी बेचव असल्याने निसर्गनिर्मित गोड पाणी या इतिहासकालीन विहिरीत आढळते. सर्वसामान्यांची तहान भागविणारी ही विहीर कधीच आटत नाही, हे विशेष."

Advertisement
Tags :
# GUHAGAR#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediakokan newswell
Next Article