कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Raigad Fort: दु्र्गराज किल्ले रायगडावर सापडले ऐतिहासिक यंत्र, नाव पण आहे खास!

04:29 PM Jun 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

ऐतिहासिक खगोलशास्त्रीय उपकरण यंत्रराज अर्थात सौम्ययंत्र सापडले आहे

Advertisement

रायगड : ऐतिहासिक किल्ले रायगडावर भारतीय पुरातत्त्व विभाग आणि रायगड विकास प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या उत्खनन कार्यादरम्यान एक ऐतिहासिक खगोलशास्त्रीय उपकरण यंत्रराज अर्थात सौम्ययंत्र सापडले आहे. या शोधामुळे रायगडाच्या बांधकामात तत्कालीन अत्याधुनिक व शास्त्रोक्त पद्धतींचा वापर झाल्याचा महत्वपूर्ण पुरावा हाती लागल्याची माहिती माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिली.

Advertisement

खगोलशास्त्रीय अभ्यास करून तत्कालीन अत्याधुनिक व शास्त्रोक्त पद्धतीने दुर्गराज रायगडाचे बांधकाम झाले होते. याबाबतचा महत्वपूर्ण पुरावा सापडला आहे. दुर्गराज रायगड येथे भारतीय पुरातत्त्व विभाग व रायगड विकास प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या उत्खनन प्रक्रियेमध्ये गडावर प्राचीन सौम्ययंत्र हे खगोलशास्त्रीय उपकरण सापडले आहे.

प्राचीन कालखंडापासून ग्रहताऱ्यांच्या अभ्यासासाठी, दिशांचा वेध घेण्यासाठी तसेच वेळ मोजण्यासाठी वापरण्यात येणारे महत्वाचे यंत्र म्हणजे 'Astrolabe'. याला ‘यंत्रराज’ या नावानेही ओळखतात. अक्षांश, रेखांश, कर्कवृत्त, विषुववृत्त यांसारख्या गोष्टींचा अभ्यास करणे सोपे व्हावे म्हणून या यंत्राचा वापर केला जात असे. रायगडाचे बांधकाम करीत असताना खगोलशास्त्रीय अभ्यास करण्यासाठी या यंत्राचा वापर झाला असण्याची शक्यता आहे.

भारतीय पुरातत्त्व विभाग व रायगड विकास प्राधिकरण यांच्या संयुक्त प्रयत्नांनी रायगड येथे मागील काही वर्षांपासून उत्खननाचे कार्य सुरू आहे. मागील तीन ते चार वर्षापासून गडाच्या विविध भागात रोपवे अप्पर स्टेशनच्या मागील बाजूस ते कुशावर्त तलावापर्यंत व बाजारपेठ ते जगदीश्वर मंदिर या भागांमधे जे शिवकालीन वाड्यांचे अवशेष आहेत, अशा जवळपास 10 ते 12 ठिकाणी हे उत्खनन पूर्ण करण्यात आले आहे.

यामध्ये प्रामुख्याने कुशावर्त तलावाच्या वरील भागात व पर्जन्यमापक आणि वाडेश्वर मंदिराच्या मधील भागात असलेल्या ऐतिहासिक वाड्याच्या जागेवर उत्खनन कार्य राबवले असता त्या ठिकाणीच हे सौम्ययंत्र खगोलशास्त्रीय उपकरण सापडले आहे. अभ्यासकांना मोठी संधीया यंत्रराजवर वरील बाजूस काही अक्षरे कोरलेली आहेत. मध्यभागी एक कासव/सापसदृश दोन प्राण्यांचे अंकन केले आहे.

त्यांचे मुख व शेपटी कुठल्या दिशेला असावी, हे समजण्यासाठी वरील बाजूस मुख आणि पूंछ अशी अक्षरेही कोरली आहेत. यावरून उत्तर व दक्षिण दिशा कुठे असावी, याचा अंदाज बांधणे सोपे जात असावे. या सापडलेल्या अमूल्य ठेवल्यामुळे इतिहास अभ्यासकांना पुढील संशोधनासाठी खूप मोठी संधी उपलब्ध झाली आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

Advertisement
Tags :
#chhatrapati sambhajiraje#Raigad#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediaArchaeological Survey of Indiaraigad fortShiv Rajyabhishek ceremony
Next Article