महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मुख्य माहिती आयुक्तपदी हीरालाल सामरिया

06:08 AM Nov 07, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली शपथ

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

देशाला नवा माहिती आयुक्त मिळाला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी माहिती आयुक्त हीरालाल सामरिया यांना सोमवारी केंद्रीय माहिती आयोगाच्या प्रमुखपदाची शपथ दिली आहे. वाय.के. सिन्हा यांचा कार्यकाळ 3 ऑक्टोबर रोजी संपल्यापासून हे पद रिक्त होते.

सामरिया यांची मुख्य माहिती आयुक्त म्हणून नियुक्ती झाल्यावर माहिती आयुक्ताची 8 पदे रिक्त आहेत. आयोगात सध्या दोन माहिती आयुक्त आहेत. आरटीआय विषयक सर्वोच्च अपीलीय प्राधिकरण केंद्रीय माहिती आयोगात एक मुख्य माहिती आयुक्त आणि कमाल 10 माहिती आयुक्त असू शकतात. सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय माहिती आयोग आणि राज्य माहिती आयोगांमधील रिक्त पदे भरण्यासाठी पावले उचलण्याचा निर्देश केंद्र आणि राज्य सरकारांना 30 ऑक्टोबर रोजी दिला होता. रिक्त पदे भरण्यात न आल्यास माहिती अधिकार कायदा निष्प्रभावी ठरणार असल्याची टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली होती.

सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने कार्मिक तसेच प्रशिक्षण विभागाला  राज्य माहिती आयोगांमध्ये मंजूर पदे, रिक्त पदे आणि प्रलंबित प्रकरणांच्या एकूण संख्येसमवेत अनेक पैलूंवर सर्व राज्यांकडून माहिती मिळविण्याचा निर्देश दिला होता.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article