For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हिरेबागेवाडी पोलिसांचा जुगारी अड्ड्यावर छापा

06:22 AM Jan 11, 2026 IST | Tarun Bharat Portal
हिरेबागेवाडी पोलिसांचा  जुगारी अड्ड्यावर छापा
Advertisement

साडेतीन हजार रुपये रकमेसह पाच जुगाऱ्यांना अटक

Advertisement

बेळगाव :

बस्तवाडजवळील धामणे रोडनजीक सुरू असलेल्या एका जुगारी अ•dयावर छापा टाकून हिरेबागेवाडी पोलिसांनी पाच जुगाऱ्यांना अटक केली. शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याजवळून 3 हजार 600 रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. धामणे रोडवरून स्मशानाकडे जाणाऱ्या रस्त्याशेजारी जुगारी अड्ड् थाटण्यात आला होता. या अ•dयावर अंदर-बाहर जुगार सुरू असल्याची माहिती मिळताच हिरेबागेवाडीचे पोलीस उपनिरीक्षक अविनाश ए. वाय. व त्यांच्या सहकाऱ्यांनी अचानक छापा टाकून पाच जणांना अटक केली. बुद्धराज शांतीनाथ भागण्णावर (वय 33) राहणार संभाजी गल्ली, बस्तवाड, किरण नारायण खिल्लारे ऊर्फ गवळी (वय 45) राहणार अळवण गल्ली, शहापूर, भरतेश माणिक संकेश्वरी (वय 52) राहणार होसगेरी गल्ली, बस्तवाड, विनायक प्रकाश गवळी (वय 37) राहणार अळवण गल्ली, शहापूर, सूरज प्रकाश दळवी (वय 28) राहणार मेन रोड, बसवण कुडची अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे असून, त्यांच्यावर कर्नाटक पोलीस कायदा कलम 87 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

Advertisement

.