महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

इम्रान खानच्या पक्षावर बंदी घालण्याचे संकेत

06:16 AM Jul 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ इस्लामाबाद

Advertisement

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) या पक्षावर बंदी घालण्याचा विचार पाकिस्तान सरकारने चालवला आहे. शाहबाज शरीफ सरकारमधील माहिती मंत्री अताउल्ला तरार यांनी यासंबंधीचे स्पष्ट संकेत दिले. आपले सरकार ‘पीटीआय’वर बंदी घालणार असून नजिकच्या काळात पाकिस्तान आणि ‘पीटीआय’ एकत्र राहू शकत नाहीत. हा पक्ष आणि त्याची विचारधारा देशासाठी धोकादायक बनली आहे. ‘पीटीआय’चे समर्थक देशविरोधी कारवायांमध्ये गुंतले आहेत, असा आरोप तरार यांनी केला आहे.

Advertisement

‘पीटीआय’वर बंदी घालण्याबरोबरच पाकिस्तान सरकारने इम्रान खान, माजी अध्यक्ष आरिफ अल्वी आणि माजी उपसभापती कासिम सुरी यांच्यावर कलम 370 लागू करण्याची घोषणाही केली आहे. सरकारच्या या पवित्र्यामुळे त्यांना भविष्यात निवडणूक लढवण्याचाही धोका निर्माण होऊ शकतो. विदेशी निधीचा मुद्दा, 9 मे रोजीची दंगल, सायफर प्रकरण आणि अमेरिकेत मंजूर झालेला ठराव पाहता ‘पीटीआय’वर बंदी घालण्यासाठी अत्यंत विश्वासार्ह पुरावे असल्याचा दावाही सरकारकडून करण्यात आला आहे.

71 वषीय इम्रान खान यांनी 1996 मध्य पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) ची स्थापना केली. ते 1996 ते 2023 पर्यंत ‘पीटीआय’चे अध्यक्ष राहिले आहेत. ऑगस्ट 2018 ते एप्रिल 2022 पर्यंत त्यांनी पाकिस्तानचे 22 वे पंतप्रधान म्हणून पदभार सांभाळला. 2022 मध्ये पंतप्रधानपदावरून पायउतार झाल्यानंतर अनेक गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. इम्रान खान  सध्या रावळपिंडीच्या अदियाला तुऊंगात बंद असून दोन खटल्यांमध्ये त्यांना शिक्षाही झाली आहे.

Advertisement
Next Article