For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हिंदुत्ववादी वक्ते गौतम खट्टर यांचे शिवप्रतिष्ठानतर्फे स्वागत

11:54 AM May 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
हिंदुत्ववादी वक्ते गौतम खट्टर यांचे शिवप्रतिष्ठानतर्फे स्वागत
Advertisement

बेळगाव : गोव्यातील वास्को येथे परशुराम जयंतीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात हिंदुत्ववादी वक्ते गौतम खट्टर यांनी सेंट झेवियर्स यांच्याबद्दलचा इतिहास सांगितला. त्यांच्या या वक्तव्याबद्दल ख्रिस्ती लोकांनी आक्षेप घेत त्यांच्याबद्दल गुन्हा दाखल केला होता. त्यांची जामिनावर मुक्तता केल्यानंतर शनिवारी ते बेळगावमध्ये आले होते. यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. गौतम खट्टर यांच्या हस्ते धर्मवीर संभाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. खट्टर यांना जामीन मिळावा यासाठी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले. अखेर त्यांची शनिवारी सुटका झाली. त्यांच्या या जामीन प्रक्रियेसाठी अॅड. अमेय प्रभूदेसाई, अॅड. सलील लवंडे यांनी कामकाज पाहिले. त्याचबरोबर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कर्नाटक प्रांतप्रमुख किरण गावडे, गोवा विभागाचे प्रमुख मंदार गावडे, सिंधुदुर्ग विभाग प्रमुख मंगेश पाटील, अक्षय राऊत, अभिजीत नाईक, विश्राम मोरजकर, म्हापसा-गोवा नारी शक्तीच्या संस्थापिका निशा वेर्णेकर यांनी प्रयत्न केले. खट्टर यांच्या सुटकेसाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी संपर्क साधला होता.

Advertisement

Advertisement
Tags :

.