..तर विशाळगडावरील दर्ग्याची बाबरी करू हिंदुत्ववादी संघटना आक्रमक
विशाळगड तात्काळ पूर्ण अतिक्रमण मुक्त करा अन्यथा...हिंदुत्ववादी संघटनेचा इशारा
कोल्हापूर
कोल्हापुरातील ऐतिहासिक विशाळगड पूर्णतः अतिक्रमण मुक्त करा या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी निदर्शने करायला सुरुवात केली आहे. हिंदुत्ववादी संघटनांचे नेते माजी आमदार नितीन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडत आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी हातात लक्षवेधी फलक घेऊन राज्य सरकारच्या या अतिक्रमणाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच हे अतिक्रमण तात्काळ हटवावं अन्यथा विशाळगडावरील दर्ग्याची बाबरी करावी लागेल असा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले, विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यास शासनातर्फे सुरुवात झाली होती. पण दरम्यान काहींनी त्याविरोधात कोर्टात गेल्यामुळे कोर्टाने अतिक्रमण विरोधी कारवाईला तात्पुरती स्थगिती दिली होती. आणि पावसाळ्यानंतर हिवाळ्यामुळे ही मोहीम पुन्हा करावी असे सांगितले होते. अद्यापही मोहीम सुरु केली नाही म्हणून हे आंदोलन करण्याता आले आहे. सरकार हे अतिक्रमण उद्घ्वस्त केल्याशिवाय थांबणार नाही. तरी असे नाही झाले तर विशाळगडावरील त्या दर्ग्याची बाबरी करू असा इशारा यावेळी माजी आमदार शिंदे यांनी दिला.