हिंदुस्थान युनिलिव्हरला 2464 कोटींचा नफा
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
एफएमसीजी क्षेत्रातील मोठी कंपनी हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेडने आर्थिक वर्ष 2024-25 मधील चौथ्या तिमाहीत 2464 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा कमावला आहे. मागच्या तुलनेत नफा 3.7 टक्के कमी दिसून आला आहे. मागच्या वर्षी समान अवधीत नफा 2558 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कंपनीने प्राप्त केला होता. याचदरम्यान एकूण उत्पन्नात चौथ्या तिमाहीत 3.5 टक्के वाढ झाली असून ते 15,979 कोटी रुपयांवर पोहचले आहे. वर्षाच्या आधारावर ही वाढ नोंदली गेली असून मागच्या वर्षी याच अवधीत कंपनीने 15,44 कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त केले होते. आर्थिक वर्ष 2025 मध्ये एकूण महसूल 64,138 कोटी रुपयांचा प्राप्त करण्यात आला आहे. जो आर्थिक वर्ष 2024 मध्ये 62,707 कोटी रुपयांचा होता. आर्थिक वर्ष 2025 मध्ये 10,649 कोटी रुपयांचे एकुण उत्पन्न कंपनीने प्राप्त केले आहे. याच्या मागच्या आर्थिक वर्षात कंपनीने 10,277 कोटी रुपये उत्पन्नाखातर प्राप्त केले होते.
समभाग घसरणीत
हिंदुस्थान युनिलिव्हरचे समभाग निकालाआधी तेजीत होते पण नंतर बंद होताना घसरणीत राहिले. निकालाआधी कंपनीचे समभाग 2.66 टक्के वाढत 2486 रुपयांवर चढले होते तर बंद होतेवेळी मात्र समभाग 4 टक्के घसरणीसह 2325 रुपयांवर बंद झाले.