हिंदुस्थान पेट्रोलियमचा नफा 6 पट वाढला
उत्पन्न पोहोचले 1.19 लाख कोटी रुपयांवर
वृत्तसंस्था/ मुंबई
हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) ने 2024-25 या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत 3,023 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा नोंदवला. वर्षानुवर्षे तो 471 टक्क्यांनी वाढला आहे. म्हणजेच गेल्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत तो जवळजवळ 6 पटीने वाढला आहे.
एका वर्षापूर्वी, कंपनीने
ऑक्टोबर-डिसेंबर दरम्यान 529 कोटी रुपयांचा नफा कमावला होता. ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत, कंपनीने 1,18,410 कोटी रुपयांचा एकत्रित महसूल कमावला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 0.35 टक्क्यांची थोडीशी वाढ झाली आहे. ऑक्टोबर-डिसेंबर 2024 मध्ये, कंपनीने 1,17,986 कोटी रुपयांचा महसूल कमावला होता.
हिंदुस्थान पेट्रोलियमचे समभाग एका वर्षात 23 टक्क्यांनी वधारले आहेत. तिमाही निकालांपूर्वी गुरुवारी (23 जानेवारी) हिंदुस्थान पेट्रोलियमचे शेअर्स 2.34 टक्क्यांनी घसरून 361.45 वर बंद झाले. गेल्या एका महिन्यात कंपनीचा समभाग 10.44 टक्के आणि या वर्षी 1 जानेवारीपासून 12.34 टक्क्यांनी घसरला आहे. तर गेल्या 6 महिन्यांत 4.31 टक्के आणि एका वर्षात 23.10 टक्क्यांची वाढ झाली आहे.