For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हिंदुस्थान पेट्रोलियमचा तिमाही नफा 18 टक्क्यांनी वाढला

06:19 AM May 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
हिंदुस्थान पेट्रोलियमचा तिमाही  नफा 18 टक्क्यांनी वाढला
Advertisement

महसूल 1.18 लाख कोटीवर, लाभांशाची घोषणा

Advertisement

मुंबई :

हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने 2024-25 या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत एकूण 1.19 लाख कोटी रुपयांचा महसूल नोंदवला. हा गेल्या वर्षीच्या तुलनेत 2.45 टक्क्यांनी कमी आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीने 1.22 लाख कोटी रुपयांचा महसूल मिळवला होता. .एकूण महसुलातून पगार, कर, कच्च्या मालाचा खर्च यासारखे खर्च वजा केल्यानंतर, कंपनीकडे स्वतंत्र निव्वळ नफ्याच्या स्वरूपात 3,355 कोटी रुपये शिल्लक आहेत. 2024 च्या जानेवारी-मार्च तिमाहीपेक्षा हा 18 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. गेल्या वर्षी कंपनीला 2,843 कोटी रुपयांचा नफा झाला होता.

Advertisement

महसूल 1.18 लाख कोटी रुपयांवर

हिंदुस्थान पेट्रोलियमचा चौथ्या तिमाहीत ऑपरेशनल महसूल 1.18 लाख कोटी रुपयांवर आला. वर्षाच्या आधारावर त्यात 2.47 टक्के घट झाली आहे. जानेवारी-मार्च 2024 मध्ये कंपनीने 1.21 लाख कोटी रुपयांचा महसूल मिळवला होता.

तिमाही निकालांमध्ये गुंतवणूकदार?

भारत पेट्रोलियमने चौथ्या तिमाहीतील निकालांसह त्यांच्या भागधारकांना प्रति शेअर 10.5 रुपये अंतिम लाभांश जाहीर केला आहे. 2024-25 च्या चौथ्या तिमाहीत कंपनीचा नफा 1,682 कोटी रुपये होण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली होती. त्यानुसार, कंपनीने अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली आहे.

समभागाची कामगिरी

हिंदुस्थान पेट्रोलियमचे समभाग एका वर्षात 16 टक्क्यांनी वाढले. हिंदुस्थान पेट्रोलियमचे समभाग बुधवारी 3.04 टक्क्यांनी घसरून 397 रुपयांवर बंद झाले. गेल्या एका महिन्यात कंपनीचा समभाग हा 13 टक्क्यांनी वाढला आहे. कंपनीचे बाजारमूल्य 84.34 हजार कोटी रुपये आहे.

Advertisement
Tags :

.