हिंदुस्थान कॉपरचा समभाग उच्चांकावर
07:00 AM Jan 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मुंबई : गुरुवारच्या भारतीय शेअरबाजाराच्या सत्रामध्ये हिंदुस्थान कॉपर या कंपनीच्या समभागाने सर्वकालिक उच्चांकांवर पोहोचण्याचा विक्रम केला आहे. कंपनीचा समभाग गुरुव ारी बीएसईवर इन्ट्र डे दरम्यान 18 टक्के इतका जबरदस्त वाढत 745 रुपयांवर पोहोचला होता. जानेवारीपासून पाहता आतापर्यंत हा समभाग जवळपास 53 टक्के इतका वाढला आहे. या तुलनेमध्ये बीएसई सेन्सेक्स 4 टक्के घसरणीत राहिला होता. तांबे धातूची निर्मिती करणाऱ्या या सरकारी कंपनीच्या समभागाने 16 वर्षाच्या कालावधीनंतर सर्वोच्च स्तरावर पोहोचण्यामध्ये लक्षणीय यश मिळविले आहे. जानेवारी 2010 मध्ये कंपनीचा समभाग 656 रुपये या त्यावेळच्या सर्वोच्च स्तरावर कार्यरत होता.
Advertisement
Advertisement