हिंदुस्थान कॉपर : शेअर 37 टक्के तेजीत
06:41 AM Dec 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मुंबई :
Advertisement
हिंदुस्थान कॉपरचा समभाग सध्याला चांगलाच भाव खाताना दिसतो आहे. या समभागाने गेल्याच आठवड्यात गुंतवणूकदारांना 37 टक्क्यांचा उत्तम परतावा देऊ केला आहे. तांबे धातूच्याबाबतीत आघाडीवर असणाऱ्या या कंपनीने गेल्या तीन तिमाहीत आणि 4 महिन्यातच गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. सोमवारी शेअरबाजारात कंपनीचे समभाग 15 टक्के वाढत 545 रुपयांच्या उच्चांकावर पोहचले होते. यायोगे कंपनीचे बाजार भांडवल मूल्य 52,300 कोटी रुपयांवर पोहचले आहे. ऑगस्ट 2025 मध्ये समभागाचा नीचांकी भाव 230 रुपये प्रति समभाग असा होता. त्यानंतर 135 टक्के इतका समभाग वधारला आहे.
Advertisement
Advertisement