हिंदुस्थान एरोनॉटीक्स समभाग नीचांकावर
06:31 AM Mar 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मुंबई :
Advertisement
हिंदुस्थान एरोनॉटीक्सचा समभाग शुक्रवारी 52 आठवड्यानंतर नीचांकी स्तरावर कार्यरत राहिला होता. बीएसईवर शुक्रवारी हिंदुस्थान एरोनॉटीक्सचा समभाग इंट्रा डे दरम्यान 3 टक्के घसरत 3580 रुपयांवर खाली आला होता. याचदरम्यान बीएसई सेन्सेक्स 1.6 टक्के इतका घसरत 74,048 अंकांवर व्यवहार करत होता. एरोस्पेस व डिफेन्स क्षेत्रातील कंपनीचा समभाग मार्च 2025 नंतर प्रथमच नीचांकी पातळीवर आला आहे. गेल्या 6 सत्रातल्या कामगिरीचा विचार करता समभाग 10 टक्के इतका घसरला आहे. यापूर्वी 16 मार्च 2025 ला समभागाने 5166 या सर्वोच्च पातळीवर पोहचण्याचा विक्रम केला होता.
Advertisement
Advertisement