For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

केजरीवालांच्या विरोधात हिंदू शरणार्थींची निदर्शने

07:00 AM Mar 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
केजरीवालांच्या विरोधात हिंदू शरणार्थींची निदर्शने
Advertisement

आप नेत्याने हिंदू शरणार्थींना ठरविले होते चोर

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

पाकिस्तानातून आलेल्या हिंदू शरणार्थींनी गुरुवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने केली आहेत. पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानातून शरणार्थी आल्यास कायदा-सुव्यवस्थेची स्थिती बिघडेल आणि चोरी तसेच लुटीच्या घटना वाढतील असे वक्तव्य केजरीवालांनी बुधवारी केले होते. या वक्तव्यानंतर हिंदू शरणार्थींकडून केजरीवालांच्या विरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. तर केजरीवालांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत सीएए देशासाठी धोकादायक असल्याचा दावा केला. पाक, बांगलादेश अफगाणिस्तान या देशांच्या अल्पसंख्याकांसाठी भारत सरकार दार उघडणार असून त्यांना देशात नोकऱ्या आणि घरं दिली जातील.  येथील लोकांच्या नोकऱ्या दुसऱ्या देशातून आलेल्या लोकांना देण्यात येतील, हा प्रकार मला मंजूर नाही असे वक्तव्य केजरीवालांनी केले आहे. घरासमोर पाकिस्तानी शरणार्थींनी झोपडी उभारली तर तुम्ही स्वत:ला सुरक्षित समजाल का असे प्रश्नार्थक विधान केजरीवालांनी उद्देशून केले आहे. पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानात 3-4 कोटी अल्पसंख्याक राहतात. भारताचे नागरिकत्व मिळविणे त्यांचे स्वप्न असून भारताने दार उघडले तर ते येथे येतील. आता पाकिस्तान आणि बांगलादेशच्या लोकांना आणून त्यांना नोकरी दिली जाईल, रेशनकार्ड तयार करण्यात येईल. येथील लोकांच्या कराच्या पैशातून केंद्र पाकिस्तानी लोकांना वसवू पाहत असल्याचा दावा केजरीवालांनी केला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.