महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

हिंदू धर्मिय यात्रेकरूंचे कुप्रवृत्तीपासून रक्षण व्हावे !

04:43 PM Jan 11, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

बजरंग दल संघटेनेचे आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळाला निवेदन

Advertisement

मालवण | प्रतिनिधी

Advertisement

धर्मांध व्यक्ती अथवा गैर हिंदूंकडून हिंदूंच्या जत्रोत्सवामध्ये येऊन थूक जिहाद, लव्ह जिहाद, यांसारखे प्रकार घडत आहेत. तसेच हिंदूंच्या काही जत्रोत्सवामध्ये इतर धर्मियांकडून आपल्या हिंदू देवतांची निंदा नालस्ती करणे व अन्य धर्माची धर्मप्रसारासाठीची पुस्तके वाटणे, त्यातून हिंदू धर्मियांचा बुद्धीभेद करणे, तसेच संमोहन करुन पैसे व वस्तूंची चोरी करणे असे प्रकार घडताना दिसून येत आहेत. त्यामुळे आंगणेवाडी भराडी देवीच्या यात्रोत्सवात हिंदू धर्मिय यात्रेकरूंचे अशा कुप्रवृत्तीपासून रक्षण व्हावे, यासाठी उपाययोजना व नियमावली जाहीर करावी अशी मागणी विश्व हिंदू परिषद अंतर्गत असलेल्या बजरंग दल संघटेनेने आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळाकडे केली आहे. आंगणेवाडी यात्रा 22 फेब्रुवारी रोजी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर बजरंग दल संघटनेने आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळ पदाधिकारी यांची भेट घेऊन निवेदन देत याबाबत मागणी केली आहे.

यावेळी बजरंग दल संघटनेचे गणेश चव्हाण, प्रसाद हळदणकर, तेजस प्रसाद, स्वप्निल घाडी, मुकुंद घाडी, देविदास भाऊ, भाऊ सामंत आदी उपस्थित होते. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, आंगणेवाडी येथील भराडी देवी हे असंख्य हिंदू धर्मीयांचे श्रद्धास्थान आहे. अनेक हिंदू भक्त देवीच्या यात्रेसाठी गेली वर्षानुवर्षे आंगणेवाडीमध्ये येऊन देवीचा कृपाआशिर्वाद घेतात व यात्रेत सहभागी होतात. सध्याच्या काही वर्षांमध्ये बातम्यांद्वारे असे वाचनात येते की, धर्मांध व्यक्ती अथवा गैर हिंदूंकडून हिंदूच्या जत्रोत्सवामध्ये येऊन थूक जिहाद, लव्ह जिहाद, यांसारखे प्रकार घडत आहेत. तसेच हिंदूंच्या काही जत्रोत्सवामध्ये इतर धर्मियांकडून आपल्या हिंदू देवतांची निंदा नालस्ती करणे व अन्य धर्माची धर्मप्रसारासाठीची पुस्तके वाटणे, त्यातून हिंदू धर्मियांचा बुद्धीभेद करणे, तसेच सम्मोहन करुन पैसे व वस्तूंची चोरी करणे असे प्रकार घडताना दिसून येत आहेत.

अनेकवेळा धर्माध व्यक्तींकडून हिंदू धर्मियांच्या जत्रोत्सवावर तसेच धार्मिक संचलन व प्रभात फेऱ्यांवर दगडफेक झालेली दिसून येते. काही वेळा हिंदू धर्मियांच्या जत्रोत्सवांमध्ये गैर हिंदू लोकांकडून दुकाने व आस्थापने यासाठी मंदिर परिसरातील जास्तीत जास्त भूमी बळकावली जाते यामुळे हिंदू दुकानदारांना स्वतःच्याच धार्मिक जत्रोत्सवामध्ये अतिशय अल्प जागेत व्यवसाय थाटावा लागतो यामुळे हिंदू दुकानदारांना आर्थिकदृष्ट्या नफा देखील होणे अशक्य होत आहे.

हिंदूंच्या काही जत्रोत्सवामध्ये गैरहिंदू धर्माध व्यक्तींकडून गुपचूपपणे पदार्थांमध्ये धुंकून तो पदार्थ हिंदूंना खायला दिल्याचे व विक्री केल्याचे आपल्याला प्रसारमाध्यमांवरील बातम्यांमधून दिसून येते. सध्याच्या काळात अनेक बांगलादेशी धर्माध घुसखोरांनी हिंदूंच्या जत्रोत्सवांमध्ये घुसून दहशतवादी कृत्य केल्याच्या बातम्या आपण पाहत आहोत. तसेच बांगलादेशी गैर हिंदूंकडून हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या जातील, अशी कृती केल्याचे आढळते. त्यामुळे या जत्रोत्सवामध्ये बांगलादेशी धर्मांधांची घुसखोरी रोखण्यासाठी दुकानदारांचे व व्यापाऱ्यांचे आधारकार्ड व अन्य ओळखपत्र तपासून प्रवेश देण्यात यावा.

आमचे देवस्थान समितीला असे निवेदन वजा विनंती आहे की, अशा अपकृत्य करणाऱ्या गैरहिंदू धर्माधांकडून हिंदू धर्मियांच्या भावनांना ठेच लागेल, अशी कोणतीही कृती घडू नये. यासाठी गैर हिंदू व्यापारी व गैरहिंदू दुकान आस्थापनांना याबाबत समज देण्यात यावी व हिंदू धर्मिय यात्रेकरुचे अशा कुप्रवृत्तीपासून रक्षण व्हावे, यासाठी उपाययोजना व नियमावली जाहीर करावी.श्री भराडी देवी मंदिर समितीला एक हिंदूत्ववादी संघटना म्हणून बजरंगदलाचे कार्यकर्त नेहमीच मदत कार्यास उपस्थित असतात व यापुढेही असतील. तरी आमच्या निवेदनाचा विचार करुन तशी कृती मंदिर समितीकडून करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg # konkan news update # sindhudurg news # marathi news #
Next Article