For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आंबोलीत ३ ते ५ जानेवारी दरम्यान हिंदू धर्मपरिषदेचे आयोजन

04:37 PM Jan 02, 2025 IST | अनुजा कुडतरकर
आंबोलीत ३ ते ५ जानेवारी दरम्यान हिंदू धर्मपरिषदेचे आयोजन
Advertisement

प्रतिनिधी
बांदा
गुरुवर्य श्री नवनीतानंद महाराज (श्री मोडक महाराज) स्थापित सद्गुरू श्री स्वामी समर्थ सेवा मठ, आंबोली येथे ३ ते ५ जानेवारी या कालावधीत हिंदू धर्मपरिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.यावेळी परमानंद महाराज, अवधूतानंद महाराज, राजेश सावंत, बाळकृष्ण देसाई यांच्यासह साधक उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे, सावंतवाडी संस्थानाचे युवराज लखमराजे भोसले उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.शुक्रवार दिनांक 3 रोजी सकाळी साडेनऊ वाजता परमानंद महाराज आणि श्री अवधूत आनंद महाराज यांच्या शुभहस्ते उद्घाटन सोहळा, श्री स्वामी समर्थ प्रतिमा पूजन, श्री नवनीत आनंद महाराज प्रतिमा पूजन आणि दीपप्रज्वलन. सकाळी दहा ते साडेदहा या वेळेत परमानंद महाराज यांच्या हस्ते होम हवन, 10:30 ते 12 या वेळेत राजेश कुंटे कल्याण नर्मदा परिक्रमा यांचे व्याख्यान, दुपारी बारा ते दोन या वेळेत अभिवक्ते राजेश मुधोळकर यांचे संभाषण व चर्चासत्र. दुपारी दोन ते तीन या वेळेत महाप्रसाद. सायंकाळी तीन ते पाच या वेळेत समीर लिमये यांचे श्री समर्थ रामदास स्वामी इतिहास कधी हिंदुत्व एक समर्थ दृष्टी याविषयी व्याख्यान. सायंकाळी पाच ते सात या वेळेत जितेंद्र महाराज पाटील यांचे कीर्तन व प्रवचन. सायंकाळी सात ते आठ या वेळेत नामजप, गुरुसंदेश वाचन. रात्री आठ ते नऊ या वेळेत ह भ प नवनीत यशवंतराव महाराज यांचे व्याख्यान. रात्र नऊ ते 11 या वेळेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक मठांचे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम.शनिवार दिनांक 4 रोजी सकाळी पाच ते सहा या वेळेत काकड आरती, सकाळी साडेसात ते साडेआठ या वेळेत परमानंद महाराज व अवधूतानंद महाराज यांच्या हस्ते होमहवन, सकाळी साडेआठ ते दहा या वेळेत गुरुचरित्र वाचन, सकाळी दहा ते अकरा या वेळेत प्रमुख उपस्थितांचे परमानंद महाराज यांच्या हस्ते स्वागत व गुरुपूजन, सकाळी 11 ते 12 या वेळेत ह भ प कावेरी मोडक महाराज यांचे प्रवचन, दुपारी बारा ते दोन या वेळेत ह भ प हेमंत मणेरिकर यांचे प्रवचन, दुपारी दोन ते तीन या वेळेत महाप्रसाद, दुपारी तीन ते चार या वेळेत ह भ प दिनेश देशमुख यांचे हिंदू संस्कृतीवर व्याख्यान, दुपारी चार ते पाच या वेळेत ह भ प मदन बलकवडे यांचे प्रवचन, सायंकाळी पाच ते सात या वेळेत संदीप महाराज मुंबई यांचा कीर्तनाचा कार्यक्रम, रात्री सात ते आठ या वेळेत आरती, नामजप, गुरुसंदेश वाचन, रात्री आठ ते दहा या वेळेत सद्गुरु श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्ट कल्याण, ठाणे मठ डोंबिवली मठ यांचे विविध प्रकारचे सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम.
रविवार दिनांक पाच रोजी सकाळी पाच ते सहा यावेळी काकड आरती, सकाळी सात ते आठ या वेळेत परमानंद महाराज यांच्या हस्ते होमवन, सकाळी आठ ते नऊ या वेळेत कल्याण येथून येणाऱ्या श्री स्वामी समर्थांच्या पालखीचे स्वागत, सकाळी साडेनऊ ते दहा या वेळेत प्रमुख उपस्थित यांचे परमानंद महाराज यांच्या हस्ते स्वागत व गुरुपूजन, सकाळी साडेनऊ ते दहा या वेळेत गुरुचरित्र वाचन, सकाळी दहा ते अकरा या वेळेत सिंधू मित्र सेवा प्रतिष्ठान सावंतवाडीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर प्रवीण ठाकरे यांचे व्याख्यान, सकाळी 11 ते दुपारी एक या वेळेत ह भ प देवराज महाराज यांचा कीर्तनाचा कार्यक्रम. दुपारी दीड ते अडीच वाजेपर्यंत महाप्रसाद, दुपारी तीन वाजता सांगता समारोह, आरती हिंदू धर्म परिषद निमित्त आयोजित विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना उपस्थित राहून भाविकांनी आशीर्वचन घेण्याचे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :

.