पंचगंगा नदीत हिंदूत्ववादी कार्यकर्त्यांनी बॅरीकेटस् तोडून केले गणेशमुर्तींचे विसर्जन !
पंचगंगा नदीच्या वाहत्या पाण्यामध्येच गणेशमुर्तींचे विसर्जन करण्याचा निर्धार केलेल्या समस्त हिंदूत्ववादी कार्यकर्त्यांनी आज पंचगंच्या पाण्यात गणेश मुर्तीचे विसर्जन केले. यावेळी पोलिसांनी त्यांनी विरोध केला असता महापालिकेने लावलेले बॅरिकेट्स तोडून संघटनांच्या कार्यकर्त्यांनी नदि परिसरात प्रवेश करत गणेश विसर्जन केले. पंचगंगेवर घडलेल्या या प्रकारामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
यावेळी बोलताना सकल हिंदू समाजाचे दिपक देसाई यांनी माध्यमांशी बोलताना फक्त हिंदू समाजालाच का लक्ष्य केले जाते असा सवाल उपस्थित केला. ते म्हणाले, हिंदुंच्या प्रत्येक सणाला प्रशासन आणि महापालिकेचा विरोध आहे. पंचगंगा नदिमध्ये मळी मिसळली जाते. दिवाळीमध्ये फटाक्या वाजवल्या वर प्रदुषणाचे कारण दिले जाते. हिंदूंच्या प्रत्येक सणाला होत असलेला अपमान हिंदुत्ववादी संघटना कधीच खपवून घेणार नाही. असा इशारा त्यांनी दिला.
दरम्यान, आज हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या समोरच महापालिकेने लावलेले बॅरिकेट्स काढून टाकले आणि नदिपत्राजवळ प्रवेश केला. यावेळी पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.