श्रीलंकन ‘टेंटिगो’चा हिंदीत रिमेक
श्रीलंकेतील चित्रपट ‘टेंटिगो’ अत्यंत गाजला होता. आता या चित्रपटाचा हिंदी रिमेक ट्रु स्टोरी फिल्म्सच्या बॅनर अंतर्गत निर्माण केला जाणार आहे. टेंटिगो हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित झाला होता आणि याला अनेक पुरस्कार देखील मिळाले होते. टेंटिगोचा हिंदी रिमेक करण्यासाठी ट्रू स्टोरी फिल्म्स आणि क्रॉलिंग एंजल फिल्म्स एकत्र आले आहेत. यात संजय गुलाटी आणि नीरज पांडे हे सहनिर्माते असतील. चित्रपटाची कहाणी हिंदी भाषेत तयार करण्याचे काम करण व्यास करणार आहेत. सर्वसाधारणपणे मी रिमेक तयार करण्याच्या बाजूने नसतो, परंतु या चित्रपटाने मला उत्साहित केले आहे. ज्या क्षणी मी श्रीलंकन टेंटिगो चित्रपट पाहिला, स्वत:चे हास्य रोखू शकलो नाही. याचा हिंदी रिमेक भारतातील लोकांना पसंत पडेल असे माझे मानणे असल्याचे हंसल मेहताने म्हटले आहे. टेंटिगो एका कॉमेडीच्या स्वरुपात प्रेक्षकांची मने जिंकणारा चित्रपट आहे. याच्या हिंदी रिमेकद्वारे तो अधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे संजय गुलाटी यांनी सांगितले आहे.