महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

हिंडलगा ग्रामस्थांचा घरपट्टी वाढीविरोधात ग्रा. पं.वर मोर्चा

11:11 AM Oct 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वार्ताहर /हिंडलगा 

Advertisement

हिंडलगा ग्राम पंचायत क्षेत्रातील सर्व घरांची घरपट्टी वाढ अधिक झालेली असून चार ते दहा पटीने ही वाढ केलेली आहे. त्या विरोधात हिंडलगा येथील संतप्त ग्रामस्थांनी ग्राम पंचायतवर शुक्रवार दि. 4 रोजी सकाळी साडे दहा वाजता भव्य मोर्चा काढला. या मोर्चाची सुऊवात बॉक्साईट रोड कलमेश्वर मंदिरपासून झाली. महादेव गल्ली, रामदेव गल्ली, बेळगाव वेंगुर्ला रोड, हायस्कूल रोडमार्गे ग्रामपंचायतवर पोहोचला. मोर्चाचे नेतृत्व रमाकांत वाय. पावशे, गजानन ए. काकतकर, श्रीकांत जाधव, नितीन मासेकर, अऊण एन. नाईक, संदीप मोरे, प्रकाश बेळगुंदकर, चंद्रकांत डी. कुलकर्णी, प्रकाश कडोलकर, उदय नाईक, बळवंत बेळगुंदकर, अनिल हेगडे, तुकाराम फडके, मुकुंद हदगल व श्रीराम सेनेचे प्रवीण देवगेकर यांनी केले.

Advertisement

यावेळी ग्रामपंचायतकडून किती अन्याय होतो याचा अनुभव घेतलेले निवृत्त प्राचार्य चंद्रकांत डी. कुलकर्णी, निवृत्त स्टेट बँक व्यवस्थापक अऊण एन. नाईक, सदाशिव जगताप व गजानन काकतकर यांनी आपल्या मनोगतातून सांगितले. यावेळी रमाकांत पावशे यांनी निवेदन देण्यापूर्वी ग्रामपंचायत क्षेत्रातील घरपट्टी वाढविरोधात उपस्थितांना माहिती दिली व ही वाढ करण्यापेक्षा आमची घरे ग्रामपंचायतने विकत घ्यावीत व आम्हाला भाडेतत्त्वावर ठेवून घ्यावे, असे नमूद करून महानगरपालिकेच्या कोणत्याही सुविधा नसताना महानगरपालिकेच्या दुप्पट ही वाढ केल्याचे पुराव्यानिशी सिद्ध करून या वाढविरोधात विरोध दर्शविला. व ही वाढ कमी नाही झाली तर न्यायालयात जाण्याबाबतचे वचन दिले.

निवेदनाचा स्वीकार ग्रामपंचायत कर्मचारी देवाप्पा एन. जगताप यांनी केला. यावेळी ग्रामपंचायत अध्यक्षा मीनाक्षी हितलमणी, उपाध्यक्षा उपाध्यक्षा चेतना अगसगेकर, सदस्य विठ्ठल देसाई, रामचंद्र कुद्रेमनीकर, रामचंद्र मनोळकर, प्रवीण पाटील व इतर सदस्यांचा समावेश होता. यावेळी उपस्थित असलेल्या श्रीमती कुट्याळ यांनी गावातील स्मशानभूमीच्या अस्वच्छतेबाबत तक्रार मांडली. याबाबत ग्रामपंचायतच्या वतीने ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल देसाई यानी स्मशानभूमीचे सौंदर्यीकरण लागलीच करणार असल्याचे आश्वासन दिले.

ग्रामपंचायत क्षेत्रातील रस्ते, गटारी, कचऱ्याबाबतही तक्रारी 

या निवेदनात ग्रामपंचायत क्षेत्रातील रस्ते, गटारी, अस्वच्छता व दुभाजकावरील विद्युत दिवे, संगणक उतारा याबाबत देखील तक्रार देण्यात आली. या मोर्चात हिंडलगा, लक्ष्मीनगर, विजयनगर, रक्षक कॉलनी, मांजरेकरनगर, कलमेश्वरनगर, श्रीनाथनगर या सर्व भागातून मोठ्या संख्येने नागरिक व महिला उपस्थित होत्या. यानंतर या मोर्चातील प्रतिनिधी जिल्हाधिकारी, जि. पं. कार्यनिर्वाहक अधिकारी, ता. पं. कार्यनिर्वाहक अधिकारी यांना निवेदन देण्यासाठी जाऊन त्या त्या अधिकाऱ्यांना निवेदने देण्यात आली. ग्रामपंचायतवर काढण्यात आलेला आतापर्यंतचा हा पहिलाच मोर्चा असून जनतेचे लक्ष या मोर्चाकडे होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article