For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हिंडलगा श्री मसणाईदेवी यात्रेला उत्साहात प्रारंभ

10:58 AM Feb 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
हिंडलगा श्री मसणाईदेवी यात्रेला उत्साहात प्रारंभ
Advertisement

दर्शनासाठी भाविकांची अमाप गर्दी : यात्रेत खेळण्यांचे विविध स्टॉल्स

Advertisement

वार्ताहर/हिंडलगा

येथील श्री मसणाई देवीची यात्रा प्रतिवर्षी माघ पौर्णिमेनंतर होते. यावर्षी कृष्ण पक्ष द्वितीया मंगळवार दि. 3 रोजी पहाटे मोठ्या भक्तिभावाने यात्रेला प्रारंभ झाला. देवस्थान कमिटी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मूर्तीला अभिषेक करून पूजा करण्यात आली. पुजारी कृष्णा सुणगार व पौरोहित्य दत्ता भटजी यांनी मूर्ती पूजन केले. सजविलेल्या बैलगाडीत लाकूड व वनस्पतीच्या फांद्या घालून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक महादेव गल्ली, लक्ष्मी गल्ली, रामदेव गल्ली, मरगाई गल्ली, विठ्ठल मंदिर रोड, मांजरेकर नगर, नवीन वसाहत अशा विविध भागातून फिरून गावातील सर्व मंदिरांना तेल घालून यात्रेच्या ठिकाणी आली.

Advertisement

दुपारनंतर भाविकांची संख्या वाढत गेल्याने गर्दीवर नियंत्रण वडगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी यांनी ठेवले होते. या ठिकाणी खेळण्यांची दुकाने 200 च्या घरात असून पाळणा व इतर मनोरंजनात्मक खेळांची सोय केली आहे. तिखट जेवणासाठी भाविकांची मोठ्या संख्येने रात्री 11 पर्यंत गर्दी झाली. घरोघरी विद्युत रोषणाई केली असून स्वागताचे फलक लावण्यात आले आहेत. देवस्थान कमिटीमार्फत सकाळीच अभिषेक घालून पूजा केली. तरुणानी गावात डॉल्बी लावून मिरवणूक काढली. प्रत्येकाच्या घरोघरी पाहुण्यांची रेलचेल चालू होती.

Advertisement
Tags :

.